Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The waterfall of Sahasrkund | रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंडचा धबधबा यंदा जुलै महिन्यात झाला प्रवाहित – NNL

The waterfall of Sahasrkund | रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंडचा धबधबा यंदा जुलै महिन्यात झाला प्रवाहित – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ, हिंगोली
हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे. विदर्भ- मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने सळसळ करत वाहू लागला आहे. हि बातमी समजताच आज सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी सहस्रकुंडची वाट धरली असून, पर्यटक सहस्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास गर्दी करत आहेत. नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला धबधबा पाण्या अभावी पाहत आला नाही. तर चार वर्षांपूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना वाट प...
otherwise Himayatnagar band on 30th July | दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या अन्यथा ३० जुलै रोजी हिमायतनगर बंद – NNL

otherwise Himayatnagar band on 30th July | दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या अन्यथा ३० जुलै रोजी हिमायतनगर बंद – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी रास्त असून, ती मान्य करावी आणि उपोषण थांबवावे अन्यथा त्यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ओबीसी समाज बांधवांना न्याय हक्कासाठी ओबीसी समाजचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवणा येथे अमर उपोषणास बसले आहेत. आज त्यांना उपोषणाला सात दिवस लोटले असून, शासनाने साधी दखल देखील घेतली नाही. सुरु असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सकल ओबीसी समाज त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील सकल ओबीसी बांधव स...
Himayatnagar sirpalli Road। हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी गावचा रस्ता रखडला; ग्रामस्थांनी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध -NNL

Himayatnagar sirpalli Road। हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी गावचा रस्ता रखडला; ग्रामस्थांनी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू करून पुन्हा बंद केले आहे.त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकाराला संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावरील पुलानाजीक बेश्रमाची झाडे लावून ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध करून रस्ता नाही झाला तर लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 7 कोटीच्या जवळपास विकास निधी मंजूर झाला. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अति...
DPC approves 749 crore plan for Nanded district | नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी – NNL

DPC approves 749 crore plan for Nanded district | नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या तीनही योजना मिळून शासनाकडून मंजूर 749 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला आज जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ने मंजुरी दिली. राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांना वेळेत पूर्ण करण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा, पाणीपुरवठा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले. नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 27 जुलैला सकाळी 11 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. दोन तासांवर चाललेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांचा लाभ जनतेला सुलभ पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस माजी मुख्यमंत्री...
Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। मुदखेड आदीलाबाद ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला दि 25 रोजी (सिपीएम ) सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांनी भेट देऊन स्थानकावरील चालू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. रेल्वेस्थानकावर स्वागत कक्ष स्थापन करून तेथे स्वागत कमान उभारण्यात येणार असून, त्याच बरोबर डिवायडर बसवून अंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानक आता हायटेक स्थानक होणार आहे. आखण्यात आलेल्या अंदाज पत्रकानुसार कामांना गती देऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनिकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे अश्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते. हिमायतनगर हे शहर तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले असल्याने येथे दोन्ही प्रांतातील लोक खरेदीसाठी येतात, हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून व्यापारी खरेदीसाठ...
Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 26 ते 30 जुलै 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 30 जुलै 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे....
Chief Minister Eknath Shinde | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मराठवाडा, महाराष्ट्र
मुंबई| पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आह...
Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मागास तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीने आकांक्षित कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. देशातल्या ३९९ जिल्ह्यातील ५०० आकांक्षित तालुक्याना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यातील २७ तालुक्यांचा यात समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा यात समावेश आहे. नीती आयोगामार्फत २ वेळा संपूर्ण देशभरातील ५०० आकांक्षित तालुक्याची रँकिंग झाली यात पहिल्या रँकिंग मध्ये किनवट तालुका देशातून २६९ व्या क्रमांकावर होता. तर दुसऱ्या रँकिंग मध्ये ८८ व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या रँकिंग चा डेटा प्रकाशित होणे अद्याप बाकी आहे. सद्यस्थितीत किनवट तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज मितीला किनवट त...
Citizens in the low-lying areas of Vishnupuri Dam should be careful | विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी – NNL

Citizens in the low-lying areas of Vishnupuri Dam should be careful | विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे.त्यामुळे कधीही बंधार्‍याच्या दाराला उघडले जाऊ शकते. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. 25 रोजी 83% क्षमतेने भरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्...
Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था – NNL

Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने दुचाकी चालवणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असून, आवश्यक असलेल्या भागात राजकीय नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काही ठिकाणी तर चक्क कागदावरच रस्ते करून निवडणुकीसाठी लागणार खर्चाची तडजोड करत असल्याची जोरदार चर्चा हदगाव - हिमायतनगर तालुक्यात सुरु आहे. एकूणच मतदानासाठी आश्वासनाची खैरात देणारे नेते निवडणूक झाली की गावाच्या समस्यांकडे पाठ फिरवितात..! हे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बोगस कामांसह झालेल्या दयनीय अवस्था यावरून दिसून येत आहे. खरे पाहता हिमायतनगर ते आंदेगाव या पुर्ण रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. त्यातच महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) या दिड किलोमीटर रस्त्याची हालत तर अत...
error: Content is protected !!