Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. विशेष दर्जा द्या एकतानगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे 3 लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, अस...
National highway is becoming dangerous due to partial works : अर्धवट कामांमुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोकादायक -NNL

National highway is becoming dangerous due to partial works : अर्धवट कामांमुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोकादायक -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग चे अर्धवट व संथगतीने होणा-या कामामुळे एकेरी वाहतुक व 'धोकादायक बनलेले आहे. वारंगा ते महागाव 361 हे काम नेमके नव्याने कोणत्या एजन्सीने घेतलेले आहे. या बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. वास्तविक पाहता ज्या एजन्सीने हे काम घेतलेले आहे. त्या एजन्सी कंपनीने सुचना फलक लावणे अवश्यक आहे. पण मुजोर एजन्सी ने अध्याप ही सुचना फलक लावले नाही. या वरुन हे कामकरणा-या एजन्सीच मुजोरपणा दिसुन येत आहे. गेल्या पाच वर्षापासुन वारंगा हदगाव ते गोजेगाव पर्यतचे अर्धवट कामामुळे अनेक अपघात झालेले आहेत. पण काम पुर्ण झालेले नाही ह्या अर्धवट कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी एकेरी वाहतुक असल्याने आपघाताच नेहमी धोका असतो. अनेक वाहने पलटी होत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनाची नेहमी वर्दळ असते. शहरानजिक राष्ट्रीय महामार...
A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| आमचा निधी कोणी पळवून नेत असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही.. यासाठी मंजूर करण्यात आलेला पावनमारी गावचा रस्ता झाला पाहिजे...या रस्त्याला नंबर नाही असे सांगून मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात आहे. अशी नाराजी वजा संताप व्यक्त करत गावकर्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन रस्त्याची मागणी केली आहे. रस्ता देता येत नसले तर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पावनमारी (ता. हिमायतनगर) येथील सर्व नागरिक गाव जाळून तहसील कार्यालय हिमायतनगर समोर सहकुटुंब आत्मदहन करून गाव बेचिराग करणार असल्याचा इशाराही टेम्भूर्णी पावनमारी गावकऱ्यानी निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालयात नसल्याने गावकर्यांनी अर्धा तास कार्यालय परिसरात ठिय्या मांडल्या. यावेळी नायब तहसीलदार ताडेवाड आल्यानंतर त्यांना मागणीचे निवेदन सोपविण्यात येऊन गेल्या ५० वर्षांपासून प्रलम्बित असलेल्या पावनमार...
Increase in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL

Increase in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.सकाळी नांदेड मार्गे लातूर पर्यंत व परत सायंकाळी नांदेड वरुन किनवट पर्यंत अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की,किनवट हा आदिवासी बहुल तालुका असून जिल्ह्यापासून दिडशे कि.मी.अंतरावर आहे.येथील लोकांना नांदेड येथे कामानिमित्त जाणे-येणे करावे लागते.या प्रवासाकरीता एसटी बसच्या फक्त दोनच फेऱ्या होत्या. रेल्वे चा आसरा आहे.पण सध्या मागील काही महिन्यांपासून रेल्वे उशीरा येणे, ऐनवेळी रद्द होणे इत्यादी गोष्टींमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून याचा परिणाम तालुक्यातील जनतेवर पडला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून बस खेळांमध्ये वाढ करण्याचा निर्णय किनवट आगारांनी घेतला असून सकाळी ०५.३० वाजता लातूरकरिता नांदेड मार्गे बस सोडण्यात येत आहे.लगेच ०६.३०,व दुप...
The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

महाराष्ट्र, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याचे मंजूर काम होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. पावसाळ्यात या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात असल्याची ओरड होत असून, मग हा रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारी करांमधून उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. वेळोवेळी वर्तमान पत्रात या संदर्भाच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा ...
National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली -NNL

National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 10 हजार 323 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून रक्कम 23 कोटी 28 हजार 829 इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकर...
Hang ‘Love Jihadya’ in Bharchouk ! उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या -NNL

Hang ‘Love Jihadya’ in Bharchouk ! उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या -NNL

महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ ३० जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात वज्र दल, मनसे, मानव से...
Leopard on the prowl in Mahur town | माहुर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकात दहशत – NNL

Leopard on the prowl in Mahur town | माहुर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकात दहशत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर शहरात बिबट्याचा वावर सुरु असल्याचे चित्र समाजमाध्यवर फिरत असल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासाचे तुकडे व कुत्र्याचे मास प्रिय असल्यामुळे बिबट्याचा शहरात वावर दिसून येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे. जंगल व शेवटच्या टोकाला असलेल्या शहरातील देवदेवेश्वर मंदिराच्या खाली महानुभाव पुऱ्यात सोमवार दि.२९ जुलै रोजी रात्री ११ वा. सौरऊर्जेच्या खांबाखाली राजेश मधुकर आराध्ये व संदीप भगवंतराव गोरडे यांना बिबट्या दिसून आला. या दोघांनीही दाराच्या आडून त्याचे छायाचित्र काढले असून, सध्या ते संजमाध्यमवर फिरत आहेत. शहरात बिबटच्या वावर होत असल्याच्या चर्चा आता नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहुर शहरात या अठवड्यात न्यायालय, सोनापीर दर्गा परिसर व मालवाडा घाटात बिबट्या दिस...
Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी कवाणा तालुका हदगाव जी.नांदेड येथे सुरु केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी करत हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन शहरातील मुख्य रस्त्याने एक ओबीसी लाख ओबीसी... आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं... अश्या घोषणाबाजी करत भव्य रैली काढली. यामध्ये नांदेड, हदगाव, किनवट येथील ओबीसीं समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी बांधव सामील झाले होते. ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवाणा येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. आजघडीला उपोषणाला दहा दिवस उलटले मात्र अद्याप...
Siranjani Bypass muddy road | सिरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लाऊन युवकांनी केला गांधीगिरी मार्गाने निषेध – NNL

Siranjani Bypass muddy road | सिरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लाऊन युवकांनी केला गांधीगिरी मार्गाने निषेध – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| सिरंजनी बायपास रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने सिरंजनी, एकंबा,कोठा येथील युवकानी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत रस्त्यावर वृक्ष लावून आमदार खासदार व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. तात्काळ या रस्त्याची नोंद घेऊन कायम समस्या सोडवावी अन्यथा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत राजकीय नेत्यांचा दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हिमायतनगर आद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून सिरंजनी, एकंबा, कोठा गावाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन रस्ता जीवघेणा बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाच्या बसला चिखलातून जाणे येणे करणे अवघड झाले आहे. पावसामुळे तर अक्षरशः बस बंद पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचार ...
error: Content is protected !!