Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठे,जलसंधारणाची कार्य, भूगर्भातील पाणी पातळी आदी विषयांवर एक विशेष मुलाखत उद्या आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सकाळी 8.40 वाजता प्रसारित होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची ही मुलाखत असून श्रोत्यांनी या मुलाखतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या जलसंधारणाच्या कार्यामुळे, शेततळे, नाला खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची स्थिती यावर्षीचा पाऊस, पावसा संदर्भातील नियोजन, तसेच शेतकऱ्यांसाठी असणारा सल्ला व सामान्य नागरिकांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या संदर्भातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अभ्यासपूर्ण मुलाखत उद्या सकाळी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे....
Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

नांदेड, महाराष्ट्र
अर्धापूर| येथील प्रशासकीय इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल पंधरवडा दिन साजरा करण्यात आला. कार्यालयामध्ये आणि बाहेर रंगीबेरंगी फुले, फुगे लावून कार्यालयाची सजावट करण्यात आली. कार्यालय पक्षकारांचे स्वागतच करीत आहे, असे गौरव उद्गगार अनेक पक्षकांनी काढले. दुय्यम निबंधक श्रेणी १ व्ही. बी. पदमवार यांच्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात शासनाच्या खात्यात महसूल जमा झाल्याचे दुय्यम निबंधकानी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील अगदी जवळचा आणि बागायती असलेला अर्धापुर तालुका महाराष्ट्र राज्याला परिचित आहे. मागीलवर्षी या कार्यालयात 1 हजार 977 दस्त नोंदनी झाली आहे. आठ कोटी बारा लाख 90 हजार 30 रुपये एवढा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात हे कार्यालय अव्वल ठरले असल्याची माहिती दुय्यम निबंधक व्ही.बी. पदमवार यांनी दिली. शासनास जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्यास महामार...
Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

महाराष्ट्र, मुंबई
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, ...
Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| ब्रिटिश कालीन कायदे बदलविण्याची ही योग्य वेळ असून त्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणजे एक जुलैपासून नवीन कायद्याची सुरू झालेली अंमलबजावणी. विधीक्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल असून अतिशय सोप्या शब्दात या प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली आहे. सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन उपयोगी असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी आज येथे केले. नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023...
Collecter & ceo : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींचा क्षयरोग मुक्तीबद्दल गौरव -NNL

Collecter & ceo : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींचा क्षयरोग मुक्तीबद्दल गौरव -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। २०२५ या वर्षापर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हाकेस प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातील ८६ क्षयरोगमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा येथील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ शिवशक्ती पवार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ .सम्यक खैरे व्यासपीठावर उपस्थित होते . जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना उद्देशून केलेल्या आपल्या भाषणातून संपूर्ण जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी तन-मन धनाने कार्यान्वित राहण्यासाठी प्...
समृद्धी मार्गात गेलेल्या बाभुळगाव येथील शेतकरी बांधवाच्या जमीनीना ज्यादा दर दयावा – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

समृद्धी मार्गात गेलेल्या बाभुळगाव येथील शेतकरी बांधवाच्या जमीनीना ज्यादा दर दयावा – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड। बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या मोबदल्या वाढ करून देण्याची मागणी नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रास्थांनी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यी भेट घेऊन केली आहे. नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथुन जालना - नांदेड समृध्दी महामार्गाच्या मार्ग जात असून मोबदल्यात आम्ही वारंवार पाठपुरावा करून ही अतिअल्प मोबदला देत आहेत. सदरील जमिन ही वास्तविक बाजार भावाचा विचार करता अतिशय महाग असून मिळणारा मोबदला हा तुटपुंजा असून ,पाचपटीचा सहमति देवून ही मोबदला मात्र काही बाधित शेतकऱ्यांना चार पटच मिळाला आहे. तर 12% व्याजाचा विषय कोरोना काळात न वाढलेले रेडि रेकनरने दर अशा बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे बाभुळगाव येथे आले असता बाधीत असलेल्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सरपंच पुंडलिक मस्के, माजी सरपंच दता मस्के, नां...
Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL

Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL

महाराष्ट्र
मुंबई| कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहिती आणि ज्ञानाबरोबरच वाचकांना अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अद्ययावत सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम १९७० सुधारणा समितीने आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व प्र.ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते. शाश्वत विकासाची ध्येय साध्य करणे,वाचनसंस्कृती सर्वदूर रुजविणे आणि ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी ग्रंथालयांची गरज वाढलेली आहे. वाढती लोकस...
A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| 'ज्या घरात बाई नसते त्या घराला कडीकोंडा लागतो. बाई हे घराचे शहाणपण असते. बाईशिवाय घराला घरपण नसते. खेड्यातील स्त्रीच्या वाट्याला खूप कष्टाचे जगणे येते. परंतु त्याविषयी तक्रार करण्याचे स्वातंत्र्य नसते. मी सुध्दा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझ्या सारखी बंडखोर स्त्री जेव्हा याबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बाईच्या जगण्यातील घालमेल अचूकपणे टिपणारी कविता माझ्या मातीतील श्रीनिवास मस्के हा कवी करतो याचा मला खूप अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले. नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित प्रसिध्द कवी श्रीनिवास मस्के यांच्या 'बाईपणाचा दस्तऐवज' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कवितासंग्रह...
Organization of state level competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन -NNL

Organization of state level competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय.डी.वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल. सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामा...
Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| पावनमारी गावासाठी मंजूर निधी इतरत्र वळविला जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी पावनमारी, वाघि, कामारी, टेंभुर्णी, येथील नागरिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांची दिनांक ०२ ऑगस्ट रोजी भेट घेतली आहे. यावेळी पावनमारी गावची गेल्या पंच्च्यात्तर वर्षपासून होणारी परवड थांबविण्यासाठी निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसापासून पावनमारीसाठी मंजूर झालेला रस्ता काल १.५ कोटी रुपयाचा रस्ता इतरत्र वळवून कमी लोकसंख्या असलेल्या गावाला आणखी पारतंत्र्यात ढकलण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदचे अभियंता आणि राजकीय वरदहस्त असलेल्या संबंधित ठेकेदाराकडून चालविला जात आहे. ...
error: Content is protected !!