HomeनांदेडJagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत...

Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था – NNL

मतदानासाठी आश्वासनाची खैरात देणारे नेते निवडणूक झाली की गावाच्या समस्यांकडे पाठ फिरवितात,,!

हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने दुचाकी चालवणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असून, आवश्यक असलेल्या भागात राजकीय नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काही ठिकाणी तर चक्क कागदावरच रस्ते करून निवडणुकीसाठी लागणार खर्चाची तडजोड करत असल्याची जोरदार चर्चा हदगाव – हिमायतनगर तालुक्यात सुरु आहे. एकूणच मतदानासाठी आश्वासनाची खैरात देणारे नेते निवडणूक झाली की गावाच्या समस्यांकडे पाठ फिरवितात..! हे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बोगस कामांसह झालेल्या दयनीय अवस्था यावरून दिसून येत आहे.

खरे पाहता हिमायतनगर ते आंदेगाव या पुर्ण रस्त्याची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. त्यातच महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) या दिड किलोमीटर रस्त्याची हालत तर अत्यंत खडतर आणि दयनीय झाली आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मुरुमाच्या नावाखाली माती असलेला मुरून टाकून व जे.सि.बि. मशीनने उकरून रस्त्याची आणखी दुरअवस्ता करून टाकली गेली असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. भुरकडी, पर्व आंदेगाव मधील एखाद्या व्यक्तीला तत्काळ उपचाराची गरज पडल्यास तो व्यक्ती या रस्त्याने जवळील रुग्णालयात पोहचू शकेल का..? हा एक विचार करण्याजोगा प्रश्न..? ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

IMG 20240725 WA0004 Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था - NNL

आंदेगाव पूर्व भूरकाडी येथील गावामधून काही शाळकरी मुला मुलीनां रोज हिमायतनगरला शाळेसाठी पिंपळ महादेव फाट्यापर्यंत पायी चिखलामध्ये चालत याव लागते. तरी याकडे कुठल्याही नेतेमंडळीचे लक्ष नाही. एकूणच जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात झालेली दयनीय अवस्था बघता आता गावकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी पुढे यायला हवे. अशी हाक एका युवकाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. किमान त्याने दाखविलेली जागरूकता लक्षात घेऊन गावाच्या भल्यासाठी गावातील प्रतिष्ठितांनी निवडणुकीच्या तोंडावर गावामध्ये येऊन फुकटी अस्वासने देणाऱ्या नेत्यांना जाब विचारायला हवा.

IMG 20240725 WA0006 Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था - NNL

नेहमी आमचा नेता आमचा नेता करणाऱ्या गावातील कार्यकर्त्याने देखील नेत्याच्या सतरंज्या उचलण्याचे सोडून आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो हे दाखवून देण्याची धमक ठेवणे क्रमप्राप्त आहे. पावसाळ्यात चिखलमय आणि उन्हाळ्यात खड्डेमय रस्त्याने काय त्रास होतो हे दाखऊन देऊन सरकार दरबारी हक्क मागायला सर्वानी पुढे यायला हवं. केवळ मतदानासाठी आश्वासनाची खैरात देतात आणि एकदा निवडणूक झाली की त्यांना गावच्या रस्त्याच्या व गावाचा विसर पडतो हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक असून, २१ व्या शतकामध्ये दळण-वळण सारख्या मुलभूत सुविधा सुद्धा भेटत नसतील तर मतदान करून काय..? फायदा असंही त्या युवकाने सोशल मीडियावर केलेल्या मोस्टमध्ये म्हंटले. आणि हा विषय कुणीतरी गांभीर्याने नेते/पुढारी मंडळीकडे मांडावा अशी रास्ता अपेक्षा व्यक्त केली आहे.

IMG 20240725 WA0005 Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था - NNL

डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पसरले चिखलाचे साम्राज्य
मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचा डांबरीकरण सरसम जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून लाखो रुपयाच्या निधीतून करण्यात आलं होत. मात्र अल्पवधीतच रस्त्याची वाट लागली आणि पुन्हा निवडणुकीत हा रस्ता करू व गावाचा विकासाठी निधी देऊ असे म्हणून म्हंणून नेत्याने मते मिळविली. मात्र निवडून येताच त्यांना या गावाच्या नागरिकांच्या वीज, पाणी आणि दळण-वळण सारख्या समस्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे आता रस्त्याची समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर करावी लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments