नांदेडमहाराष्ट्र

Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

हिमायतनगर। जम्मू-काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी लोकांनी निष्पाप पर्यटक यांच्यावर गोळीबार करुन भारतीय नागरीकांचा जिव घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 29 रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

जम्मूकाश्मीरमधील पहेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची २२ एप्रिल रोजी गोळ्या झाडून २६ जणांची हत्या केली. या घटनेमुळे भारतात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे, त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) रोजी हिमायतनगर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद देत या दुःखद व निंदनीय घटनेचा निषेध करत, हल्ल्यात शाहिद झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला होता. दिवसभर बाजारपेठे बंद असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे.

हिमायतनगरच्या मुस्लिम समाज बांधवांनी केला पहेलगाम हल्ल्याचा निषेध
कांही दिवसापुर्वी जम्मु -काश्मीरचा पहलगांम मध्ये पर्यटकांवर अतीरेक्यानी गोळीबार करुन निष्पाप भारतीय नागरीकांचे जिव घेतले, हे कृत्य भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. आशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत दिले. या कृत्याचा जाहिर निषेध करत दोषी अतिरेक्यांना फाशीची शिक्षा दयावी अशी मागणी करत यात जिव गमावलेले कुटूंबांच्या दुःखात सामील असल्याची भावना जफर खान लाला, अ.अखील अ.हमीद, फेरोज खान युसूफ खान, हनिफ सर, मुजीब खान युसूफ खान, अशरफ खान मुजतबा खान, अनवर खान नुरोद्दीन खान आदींसह अनेकांनी व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button