मार्कड येथील प्राचीन हेमांडपंथी मार्कडेश्वर मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध – आ. बोंढारकर
नवीन नांदेड | मार्कड येथील गावविकासासह प्राचीन आणि ऐतिहासिक हेमांडपंथी मार्कडेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे आश्वासन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिले.
मार्कड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तसेच पुनर्वसन योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा दि. २३ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक कोटी आठ लाख रुपये निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार बोंढारकर यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, “गावाच्या मूलभूत सुविधांचा विकास करतानाच सांस्कृतिक व धार्मिक वारशाचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मार्कड येथील प्राचीन हेमांडपंथी मार्कडेश्वर मंदिराचा विकास करून त्याला योग्य प्रत...









