Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sanatan jagran : सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रेचे २८ जानेवारीला नांदेडमध्ये भव्य आगमन

Sanatan jagran : सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रेचे २८ जानेवारीला नांदेडमध्ये भव्य आगमन

धार्मिक, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी, स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदान शताब्दी तसेच आर्य समाज स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामेश्वरम (तामिळनाडू) ते श्रीनगर (जम्मू-काश्मीर) अशी भव्य सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रा संपूर्ण देशभरातून प्रवास करत असून ही रथयात्रा दि. २८ जानेवारी २०२६ रोजी नांदेडच्या पावन नगरीत दाखल होत आहे. या महारथयात्रेमध्ये दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत अखंड वेद यज्ञ सुरू असून, राष्ट्रकल्याण, धर्मजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात येत आहे. शहरातील सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, सनातन जागरणचे पदाधिकारी तसेच हिंदू बांधवांनी या महायज्ञामध्ये तन–मन–धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही रथयात्रा सायंकाळी ४ वाजता चंदा सिंग कॉर्नर, नांदेड येथे दाखल होणार असून, तेथून मिरवण...
Mahur Gadachi My Renuka : नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ भव्य संगीत महोत्सवाचे मंगळवारी आयोजन

Mahur Gadachi My Renuka : नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ भव्य संगीत महोत्सवाचे मंगळवारी आयोजन

नांदेड, धार्मिक
नांदेड| महाकवी संत विष्णूदास यांच्या रसाळ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या रचनांवर आधारित ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा भव्य संगीत महोत्सव मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ५ वाजता या सांस्कृतिक पर्वाला सुरुवात होणार असून, महोत्सवातील रचनांना सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. नांदेड जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र माहूर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. याच माहूर नगरीत महाकवी संत विष्णूदास यांची समाधी असून, त्यांच्या निवडक भक्तिरचनांचा हा संगीत महोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा आणि संगीताचा सुरेल संगम ठरणार आहे. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राहणार असून, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मु...
Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, तेलंगणा, देश विदेश, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार | ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर सत्य, धर्म, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी होते. त्यांच्या बलिदानातून प्रत्येक पिढीला निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य समागमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अतुल ...
Chief Minister Devendra Fadnavis : “हिंद-दी-चादर” शहीदी समागमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन

Chief Minister Devendra Fadnavis : “हिंद-दी-चादर” शहीदी समागमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन

नांदेड, धार्मिक
नांदेड| “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईहून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आगमनावेळी विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण होते. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक द...
Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांचा महापूर

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांचा महापूर

धार्मिक, नांदेड
नांदेड| “हिंद-दी-चादर” उपक्रमांतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य समागम कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात लाखो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान परिसरात दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. भक्ती, श्रद्धा आणि शिस्त यांचे अद्वितीय दर्शन या ठिकाणी पाहायला मिळाले असून संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारलेला आहे. या शहीदी समागमासाठी देशाच्या विविध राज्यांतून तसेच सर्व धर्मांतील भाविक नांदेडमध्ये दाखल झाले असून शांतता व परस्पर सन्मान राखत सर्वजण दर्शनाचा लाभ घेत आहेत. हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत आहे. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने ...
Mla baburao kadam kohalikar : हिमायतनगरच्या मार्कंडेय मंदिराच्या विकासासाठी आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांचा मोठा निर्णय

Mla baburao kadam kohalikar : हिमायतनगरच्या मार्कंडेय मंदिराच्या विकासासाठी आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांचा मोठा निर्णय

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| संपूर्ण देशभर भगवान श्री मार्कंडेय ऋषींची जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी होत असताना, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुराव कदम पाटील कोहळीकर यांनी भाविकांसाठी आनंदाची व विकासाची मोठी घोषणा केली आहे. हिमायतनगर येथील मार्केट भागात असलेल्या प्राचीन श्री मार्कंडेय मंदिरात दर्शनासाठी उपस्थित असताना, आमदार कोहळीकर यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. विद्यमान आमदार कोहळीकर यांनी जाहिर निधीचा उपयोग पुढील विकासकामांसाठी होणार असून, मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरण, भाविकांसाठी भक्तनिवास / सभामंडप उभारणी, स्वच्छता, पाणी, प्रकाश व्यवस्था यांसह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. ...
Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

नांदेड, धार्मिक, लेख
भारतीय संस्कृतीत धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम जिथे घडतो, ती स्थळे केवळ देवदर्शनापुरती मर्यादित न राहता पर्यटनाचे प्रभावी केंद्र ठरतात. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दास मारुती मंदिर हे असेच एक आगळेवेगळे आणि दुर्मिळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. दास मारुती : दुर्मिळ संकल्पना - महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वीर मारुती किंवा दक्षिणमुखी मारुतीची मंदिरे आढळतात. मात्र दास मारुतीच्या मूर्ती अत्यंत मर्यादित आहेत. दास मारुती ही केवळ शक्तीची नव्हे, तर रामभक्ती, सेवाभाव, नम्रता आणि समर्पणाची मूर्ती मानली जाते. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे गोविंदराज स्वामी मंदिरासमोर असलेला मारुती हा दास मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. याच परंपरेतील, तितक्याच श्रद्धेने पूजिला जाणारा दास मारुती नांदेड जिल्ह्यातील लघुळ येथे विर...
Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”

धार्मिक, नांदेड
नांदेड| “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्...
Hind di chadar : ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल!’ हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने भक्तिभावाचा कळस

Hind di chadar : ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल!’ हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने भक्तिभावाचा कळस

नांदेड, धार्मिक
नांदेड | ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम वर्षानिमित्त आज नांदेड नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. आकाशात घुमणारा “बोले सो निहाल… सत श्री अकाल” चा जयघोष, हेलिकॉप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी, हजारो भाविकांचा उसळलेला भक्तिभाव आणि शिस्तबद्ध भव्य नगर कीर्तन — या सर्वांनी आजचा दिवस नांदेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी येथून प्रारंभ झाला. प्रारंभी गुरुद्वारात विधिवत अरदास करण्यात आली. गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने मानवंदना (Guard of Honor) देण्यात आली. याच वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे दृश्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले....
CIDCO ; गुरुवार बाजार, सिडको येथे शिवमहापुराण कथेला भक्तीमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ

CIDCO ; गुरुवार बाजार, सिडको येथे शिवमहापुराण कथेला भक्तीमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड | गुरुकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळ्याला दि. २२ जानेवारी रोजी गुरुवार बाजार, सिडको येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हा धार्मिक सोहळा दि. २८ जानेवारीपर्यंत चालणार असून दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथेस भागवताचार्य ह.भ.प. श्री. अनिल महाराज (माजलगांवकर) आपल्या सुमधुर वाणीने कथा सांगत असून त्यांच्या प्रवचनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिंथ वादक भाऊराव कनकापुरे व तबला वादक श्रीपाद गोनाकुडतेवार यांच्या सुरेल साथीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. दररोजच्या शिवमहापुराण कथेमध्ये विविध धार्मिक देखावे, छाकी, अवतारांचे सादरीकरण, भगवान शंकर–पार्वती विवाह सोहळा, श्रीकृष्ण दर्शन अवतार आदी प्रसं...
error: Content is protected !!