Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Pimplgaon Meeting : श्री दत्त मंदिर, श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे दिनांक 25 रोजी महत्त्वाची नियोजन बैठक

Pimplgaon Meeting : श्री दत्त मंदिर, श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे दिनांक 25 रोजी महत्त्वाची नियोजन बैठक

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार | पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंदिरातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, गतवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामकथा, श्री १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकिर्तन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर परिसरात बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीस सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात येत असून, धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी मोठ्या संख्ये...
Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर (जि. नांदेड) येथील छत्रपती शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन रोड येथे असलेल्या संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. २२ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. रविवार सकाळी ६ वाजता अभिषेक, होमहवन व विधिवत पूजा पुरोहित श्री सुनील जोशी महाराज यांच्या मंत्रोच्चारात पार पडली. त्यानंतर महंत आनंद भारती महाराज (दिशा आश्रम मठ, हरदडा) यांच्या हस्ते कलशाची पूजा-अर्चना करण्यात आली. मंत्रोच्चार व भक्तांच्या जयघोषात कलशारोहण व ध्वजारोहण सोहळा थाटात पार पडला. सोहळ्यावेळी “बजरंग बली की जय... पवनसूत हनुमान की जय...” अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेतले. दरम्यान, माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, कृष्णा पाटील आष्टीकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष मह...
Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाशिवरात्री निमित्त मागील आठ दिवसापासून आयोजित अखंड हरिणाम सप्ताह शेवटच्या दिवशी दहीहंडी व काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात, मंदिर ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तसेच मंदिराच्या नूतन कार्यालयाची पाहणी करून कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. श्री परमेश्वराच्या छायाचित्र प्रतिमेबाबत सूचना देताना त्यांनी तिरुपती बालाजीप्रमाणे आकर्षक थ्री-डी स्वरूपातील छायाचित्रे विक्रीसाठी उपलब्ध करावीत, जेणेकरून श्री परमेश्वराची महिमा अधिक दूरवर पोहोचेल, असा सकारात्मक पुढाकार समितीने घ्यावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता द...
Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार | सर्व भाविक भक्तांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब म्हणजे आपल्या परिसरात पिंपळगाव येथे मार्च महिन्यात होणाऱ्या भव्य श्रीराम कथेच्या काळात भव्य दिव्य असा १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या महायज्ञाच्या माध्यमातून आपल्या संतती, कुटुंब, समाज, धर्म व राष्ट्राच्या उन्नतीसाठी तसेच सुख, समृद्धी, आनंद व ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. प.पू. तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा महायज्ञ भाविकांसाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. महायज्ञात यज्ञकुंडात बसून सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून, ही शेवटची संधी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी चंद्रकांत माळोदे, हिमायतनगर मो. 9860624612 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भावि...
Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता

Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात (Shri Parameshwar Mandir) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दि. २० फेब्रुवारी रोजी ग्रामदिंडी व हभप नारायण महाराज गरड ( Narayan Maharaj Garad) यांच्या मधुर काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातून हजारो भक्तांचा जनसागर मंदिर परिसरात लोटला होता. पालखी दिंडीने शहर दुमदुमले सकाळी ९ वाजता व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. चिमुकल्या मुलींनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेत सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महिला-पुरुषांनी ताल धरत शहरवासीयांचे ल...
Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना

Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत गीता पाठशाळा तथा ‘ॐ शांती’ ज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. चायल परिवाराच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या ज्ञान केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून गीता पाठशाळेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. संपूर्ण परिसर ‘ॐ शांती’च्या घोषाने व सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता. यावेळी शीतल दीदी व सिंधू दीदी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सनातन ज्ञानमार्ग, आत्मशांती, नैतिक मूल्ये व जीवन परिवर्तनाच्या संदेशावर सखोल मार्गदर्शन केले. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमि...
Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

नांदेड, क्राईम, धार्मिक
लोहा| सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे (वय ५७) यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना लोहा पंचायत समिती परिसरात उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. लोहा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसनगाव (ता. लोहा) येथे कार्यरत असलेले शिंदे यांनी एका शिक्षकाकडून रजा मंजुरीसाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) पंचायत समिती कार्यालय परिसरात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पथकाने पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या वतीने लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिंदे यांना अटक करून पुढील चौकशी...
Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मदसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांना समभावाने व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर येथील मंदिर समितीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिर प्रशासनाने रांगा व्यवस्थापन, पाणी व फराळ व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची नियुक्ती आदी बाबींमध्ये केलेल्या नियोजनामुळे लाखो भाविकांचे दर्शन निर्विघ्न पार पडले. याबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सामाजिक कार्यकर्ते बंटी गुड्डेटवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी किशोर स्वामी, डॉ. राजेंद्र वानखेडे, गजानन तुपतेवार, मारोती हेंद्रे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य व अनेक भाविक उपस्थित होते. महाशिवरात्रीसारख्या मोठ्या धार्मिक उत्सवात केलेले शिस्तबद्ध नियोजन व सेवाभावामुळे भक्तांमध्ये समाधान व्...
Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न

Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नवसाला पावणारा जागृत देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागले. रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन रांग सुरूच होती. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी पारण्याचा उपवास धरून रात्रभर जागरण केले. मध्यरात्री वतनदारांच्या पूजेनंतर श्री परमेश्वराचा अभिषेक, महाआरती तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा पार पडला. सोने–चांदीचे अलंकार, चंद्रहार, नेकलेस, बहुपदरी हार, बाजूबंद, कर्णकुंडले आदी आभूषणांनी श्रीची मूर्ती सुवर्णकार बाबुराव सकवान यांच्या हस्ते सजविण्यात आली. हा अलंकार सोहळा तहसीलदार व मंदिर विश्वस्तांच्या उपस्थितीत...
Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

धार्मिक, नांदेड
इस्लापूर/किनवट | महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र नागडोह देवस्थानात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित होऊन महादेवाचे दर्शन घेऊन शेतकरी, मायबाप जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान परिसरात सुव्यवस्थित दर्शन व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते....
error: Content is protected !!