Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ram Janmashtami : नांदेडच्या सिडकोतील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा ; 19 ते 27 मार्चदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

Ram Janmashtami : नांदेडच्या सिडकोतील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा ; 19 ते 27 मार्चदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| शहरातील सिडको परिसरातील रामनगर येथे असलेल्या श्री राम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन 19 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. मंदिर संस्थानचे हे ३५वे वर्ष असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज सकाळी 6 ते 8.30 या वेळेत श्रीरामाचा पवमान अभिषेक, आरती व नित्यपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 19 ते 25 मार्चदरम्यान दररोज दुपारी 2.30 ते 6 वाजेपर्यंत ह.भ.प. प्रणव जनार्दन पटवारी (माजलगाव, जि. बीड) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीरामकथा सादर होणार आहे. या रामकथेला तबल्यावर संजय देशपांडे आणि संवादिनीवर अर्जुन गुंडाळे साथ देणार आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रुद्र स्वाहाकार महायज्ञ (पौराहित्य : सुशीलगुरु कुलकर्णी) आयोजित करण्यात आला आहे. 26 मार्च रोजी सकाळी 10 ...
Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, धार्मिक
मुंबई| ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पुस्तकाचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे आणि शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सुंदर आणि आकर्षक कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करताना त्यांना विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा वारीतून प्रकट होते, जी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या आराधनेत अनुभवता येते. प्रत्येक वारीत अनेक कथा जन्म घेतात आणि त्या या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, तीर्थ आणि त्या तीर्थातील देव या दोन्हींचे महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित झाले आहे. इतिहास...
Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

नांदेड, तेलंगणा, धार्मिक
नांदेड | तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील अत्तापुर परिसरातील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथील माननीय पंज प्यारे साहिबान यांनी स्पष्ट केले आहे. १५ मार्च २०२६ रोजी अत्तापुर, हैदराबाद येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या सुमारे १.५ एकर जमिनीवर प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. संबंधित जमीन गुरुद्वारा साहिबची असल्याचा दावा करण्यात येत असून या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाचा निकाल गुरुद्वारा साहिबच्या बाजूने लागल्यानंतर काही स्थानिकांनी ही जमीन मंदिराची असल्याची तक्रार प्रशासनाकडे केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत १.५ एकर जमिनीतून सुमारे १००० गज जमीन गुरुद्वारा साहिबकडे ठेवून उर्वरित जमिनीवर जप्तीची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई...
Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तीमय सोहळा १९ मार्चपासून सुरू होऊन २६ मार्चपर्यंत चालणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. कारला गावात गेल्या अकरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यात भव्य शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. या सप्ताहात शिवपुराण कथा ह.भ.प. बालयोगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून सादर होणार आहे, तर ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ गणेश महाराज मुटेवाड हे सांभाळणार आहेत. ...
Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

नांदेड, धार्मिक
नांदेड| संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह (व्ही.आय.पी. रोड) येथे संपन्न होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष मह...
Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

धार्मिक, नांदेड
नांदेड| राम नवमीच्या पावन पार्श्वभूमीवर नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डी येथे २५ मार्च रोजी भव्य साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी,श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी (गोरठे),साईं मानव सेवा ट्रस्ट, साईं धाम ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे भव्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन सर्व साई भक्तांसाठी खुले असून देशभरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे. या संमेलनासाठी मुंबई, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या ...
Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

नांदेड, धार्मिक
नांदेड/हिमायतनगर, गोविंद गोडसेलवार| आजची तरूण मुल डोक्यावर केस, चेहऱ्यावर दाढी, कंपाळी चंद्रकोर, लावुन छत्रपती शिवाजी महाराजां सारख काहिस दिसन पसंत करत आहेत, परंतु तरूणांनी राजे छत्रपती सारख दिसन नाही तर असन म्हत्वाच आहे, असा सल्ला तरूण मंडळींना हभप राम महाराज पांगरीकर यांनी दिला ते अखंड हरिणाम सप्ताहातील शेवटच्या दिवशी सरसम बु येथे काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलत होते. विचारपिठावर गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज सिबदरेकर, सिंथवादक दत्ताजी नलावडे, साईनाथ शिंदे, हभप शिवाजीराव वडगावकर, हभप रामराव माने पोटेकर, संदिप पाटिल पवनेकर, मृदंगाचार्य वैभव सावळेश्वरकर, यांची उपस्थिती होते. काल्याच्या किर्तनात पुढे बोलतांना हभप राम महाराज म्हणाले, काला जीवनाच महत्त्व सांगणारा आहे, भगवान म्हणतात सहा दिवस तुम्ही सप्ताह केला, सहा दिवस तुमची उपस्थिती होती, आज मी तुम्हाला प्रसाद द्यायला येतो, तो काल्याचा ...
Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील ७ वर्षीय अरीबा तस्कीन मिर्झा अकबर बेग हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवत धार्मिक परंपरेचा सुंदर आदर्श निर्माण केला. रविवारी (८ मार्च) तिने पहिला रोजा ठेवल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी तिचे नाना असद मौलाना, मोठे मामूजान मोहम्मद मुदस्सिर, छोटे मामूजान मोहम्मद मुबाशिर, तसेच नानी साहेबा, दादी साहेबा, कुटुंबातील खाला, खालू आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. अरीबाच्या पहिल्या रोज्याबद्दल सर्वांनी तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच कुटुंबातील मिर्झा जहीर बेग, मिर्झा अजहर बेग, मिर्झा अब्बास बेग, मिर्झा खादिर बेग, मिर्झा गनी बेग, मिर्झा सलाम बेग यांच्यासह तिचे वडील मिर्झा अकबर बेग आणि इतर नातेवाईकांनी अरीबाच्या या धार्मिक जिद्दीचे कौतुक करत तिच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी अरीबा...
Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर/हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने मार्च महिन्यात आयोजित भव्य दिव्य श्री रामकथा, श्री १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याच्या पूर्वतयारी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण Ashok Chavan व आमदार बाबुराव कदम कोहळीकर Baburao Kadam Kohalikar यांनी उपस्थित राहून भक्तगणांशी संवाद साधला. सादर बैठकीस बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम कथा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली Meghna Kavli, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील Archana Patil यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत...
Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी

Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी

क्राईम, धार्मिक, नांदेड
नांदेड /नायगाव | नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोरट्यांनी मंदिरातील देवाच्या चांदीच्या दागिन्यांमध्ये सुमारे ६५ तोळ्यांचा एक मुकुट, ३३ तोळ्यांचा दुसरा मुकुट, तसेच ३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपाटातील अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटे मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. श्वान ‘कोको’चा चोख तपास घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान ‘कोको’ हिला कपाटाची चावी व ड्रॉवरचा वास देण्यात आला. त्यानंतर तिने मंदिर परिसरातून वास घेत थेट पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेगाव–कार्...
error: Content is protected !!