Homeधार्मिकPrayers for Rain : नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाला पावसासाठी साकडे; हिमायतनगरात शेतकऱ्यांची महाप्रसादाची...

Prayers for Rain : नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाला पावसासाठी साकडे; हिमायतनगरात शेतकऱ्यांची महाप्रसादाची पंगत

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असताना, हिमायतनगर–सवना रस्त्याच्या शिवेवर नवसाला पावणाऱ्या वडाच्या झाडाखाली वसलेल्या प्राचीन मारोती मंदिर परिसरात शेतकरी आणि हनुमान भक्तांनी श्रद्धेने पावसासाठी साकडे घातले.

शनिवारी सकाळी मारोतीरायाची विधिवत अभिषेक पूजा करून ‘बळीराजावर कृपादृष्टी ठेवावी आणि लवकरच दमदार पाऊस बरसावा’, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता भव्य महाप्रसादाच्या पंगतीला सुरुवात झाली.

या धार्मिक उपक्रमासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, महिला-पुरुष नागरिक, बालगोपाल, मारोती भक्त तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘नवसाला पावणारा मारोतीराया भक्तांची मनोकामना पूर्ण करतो’, अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे.

IMG 20260718 222735 scaled Prayers for Rain : नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाला पावसासाठी साकडे; हिमायतनगरात शेतकऱ्यांची महाप्रसादाची पंगत
Oplus_16908320

दरम्यान, सकाळपासून महाप्रसादाच्या पंगतीची तयारी सुरू असतानाच परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे भाविकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच मोठा पाऊस होऊन शेतीला जीवदान मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.

श्रद्धा, सेवा आणि शेतकरीहिताची भावना यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून ‘मारोतीरायाच्या कृपेने यंदा भरपूर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांच्या शेतात हिरवाई नांदावी’, अशी सामूहिक भावना व्यक्त करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments