HomeनांदेडRajmata Jijau Buses : हदगाव आगाराच्या ताफ्यात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांची भर

Rajmata Jijau Buses : हदगाव आगाराच्या ताफ्यात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांची भर

नांदेड/हदगांव/हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव आगाराच्या ताफ्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे विधिवत पूजन आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या बससेवेमुळे हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने या नव्या बसगाड्यांची भर महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन बसगाड्यांमुळे सेवा अधिक गतिमान व गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास आमदार बाबुराव कदम यांनी व्यक्त केला.

IMG 20260718 WA0056 Rajmata Jijau Buses : हदगाव आगाराच्या ताफ्यात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांची भर

यावेळी आगारप्रमुख धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य ढोले बापू, नगराध्यक्ष प्रतिनिधी भास्कर वानखेडे, शहरप्रमुख बबन माळोदे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, देशमुख काका, नगरसेवक गोपाल सारडा, नामदेव वाकोडे, पांडुरंग जाधव, बालाजी शिंदे, नगरसेवक प्रतिनिधी बालाजी राठोड, गजानन मस्के, गजानन पतंगे, शरद कदम, अशोक पवार, सुभाष पवार, दिनेश मेहत्रे, राम सूर्यवंशी, विजय शिंदे, आदिल खान, अल्ताफ खान यांच्यासह आगारातील अधिकारी-कर्मचारी, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत करताना, नव्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments