Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

blood donation camp and Mahaprasad at Shri Parameshwara temple : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा अनेकांनी घेतला लाभ -NNL

blood donation camp and Mahaprasad at Shri Parameshwara temple : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा अनेकांनी घेतला लाभ -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो महिला पुरुष भाविक भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला तर अनेक महिला पुरुषांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे. पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकानच्या जागृत महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित करून जाणतेमध्ये आपला हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी श्रियाळ स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान आणि अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर संबंध भारतात प्रसिद्ध असले...
Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे. संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्यक्षपदी काँग्रेसचे खा. के.सी. वेणुगोपाल यांची वर्णी लागली आहे. या समितीत लोकसभेतून १५ तर राज्यसभेत ७ खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये लोकसभेचे टी.आर. बालू, डॉ. निशिकांत दुबे, जगदंबिका पाल, जय प्रकाश, रविशंकर प्रसाद, सी.एम. रमेश, एम. श्रीनिवासुलु रेड्डी, प्रो. सौगत रॉय, अपराजिता सारंगी, डॉ. अमर सिंह, तेजस्वी सूर्या, अनुराग सिंग ठाकूर, बालशौरी वल्लभनेनी, के.सी. वेणुगोपाल, धर्मेंद्र यादव तर राज्यसभेतून अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, डॉ. के. लक्ष्मण, प्रफुल्ल पटेल, सुखेंदू शेखर राय, तिरुची शिवा, सुधांशू त्रि...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय
धाराशिव| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्क्रिय कारभार व जनहित विरोधी धोरणाचा विधानसभा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून झारखंड व दिल्ली या राज्याच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रात एकाच वेळी तिन्ही राज्याच्या निवडणुका केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग जाहीर करील असे स्पष्टपणे दिसत असल्याचे मत समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असली तरी निवडणूक आयोगाला सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तसेच झारखंड व दिल्ली या राज्याच्या कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी मध्ये संपत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या दोन राज्याचे अगोदर घेतल्या तर त्याचा प्रतिकूल परिणाम झारखंड व दिल्ली या राज्याच्या मतदानावर होईल. त्यामुळ...
Naseem Khan : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू: नसिम खान -NNL

Naseem Khan : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू: नसिम खान -NNL

राजकीय
मुंबई| अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती झाल्याने अल्पसंख्याक समाजासह सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. नसीम खान यांच्या रुपाने अल्पसंख्याक समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अल्पसंख्याक समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पक्षानेही वेळोवेळी संधी दिलेली आहे.राहुलजी गांधी, मल्लिकार्जून खर्गे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या नवीन जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व मह...
महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे। ओबीसी बचाव मेळावा भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेड मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या obc आरक्षणात मराठा समाज घुसखोरी करू पाहत आहे. आज पर्यंत सर्व सत्ता त्यांच्याच हाती आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत तेच सत्ताधारी असतानाही मराठा समाजाला ई डबल्यू एस, एस. बी. सि.यासारखे आरक्षण देऊनही आता दबावतंत्राचा वापर करून ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता आता सर्व ओबीसी नी एकत्र येऊन आपला माणूस कसा निवडून आणता येईल हेच ध्येय ठेवा असा सबुरीचा सल्ला दिला. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही.नाहीतर पुढीची पिढी तुम्हाला माफ करणार नाही असेही ठनकाहून सांगितलं.तर अशोक चव्हाण अंतरवेलीला अनेकदा पायघडी घालायला जातात पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील, मतदार संघातील ओबीसी च उपोषण ...
Girish Mahajan : केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, ...
Arunbhau Chavan : कोपराला गूळ लावून चाटायला लावण्याच काम गेली ७७वर्षा पासूनराज्यकर्ते करीत आले – अरुणभाऊ चव्हाण -NNL

Arunbhau Chavan : कोपराला गूळ लावून चाटायला लावण्याच काम गेली ७७वर्षा पासूनराज्यकर्ते करीत आले – अरुणभाऊ चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| भोकर विधानसभेतील लोकांना मूर्ख बनवून आज पर्यंत सत्ता लाटण्याचे महापाप येथील राज्यकर्त्यांनी गेली ७७ वर्षांपासून करत आले. त्यांनी फक्त कोपराला गूळ लावला आणि येथील जनतेची दिशाभूल करीत त्यांना विकासच स्वप्न रुपी गूळ चाटायला लावला पण प्रत्येक्षात मात्र विकास फक्त काही मोजक्याच लोकांनाचा करून त्यांचीच घर भरली असा जळजळीत सवाल भोकर येथील त्यांच्या विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी केला. कारण होते राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर प्रथम आयोजित पत्रकार परिषदेचे.भोकर येथे शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी भोकर विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने हाल चाल सुरु केली असून त्यानिमित्त तालुक्यातील पत्रकार यांचा परिचय व पुढील रणनीती यांची माहिती देण्यासाठी त्यात त्यांनी आजावर झालेल्या आमदार य...
Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| महाराष्ट्र राज्यसह अनेक राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार असल्यामुळे प्रमुख पक्षासह अनेकजण आमदारकी लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यातच भोकर विधानसभा क्षेत्र नेहमीच काही ना काही गोष्टी साठी राज्यात चर्चेत असते त्याच कारणाने की काय. मागच्या लोकसभेचा निकाल पाहता येथील काँग्रेस पक्षा कडे अनेकांनी उमेदवारी साठी मागणी केली तर सध्या तरी भाजपा कडून एकाच महिलेची मागणी दिसत आहे अशात आता भोकर चा आमदार मला व्हायचं अशी भूमिका घेत थेट पत्रकार परिषद घेऊन तृतीय पंथी पायल ने करत भावी आमदारांना एक प्रकारे धक्काचं दिला. भोकर विधानसभा हे नेहमी काही ना काही विषयासाठी चर्चेत असते त्यातच आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेकांच्या भुवया उनंचावल्या आहेत. जो-तो म्हणतो मला आमदार व्हायचं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सरळ सामना राहण्याचे सध्यातरी चिन्ह दि...
Nana Patole. ; मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे एटीएम बंद करू: नाना पटोले – NNL

Nana Patole. ; मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे एटीएम बंद करू: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदीशाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला, या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड...
Nana Patole : तिरंगा देशाची शान, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले -NNL

Nana Patole : तिरंगा देशाची शान, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला आणि देश संपन्न झाला. ७८ वर्ष हा तिरंगा डौलाना फडकत आहे पण आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी ख...
error: Content is protected !!