Friday, May 15

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगांव-हिमायत्तनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर दि ३१ आगस्ट रोजी हिमायत्तनगर येथे आदिवासी समाज बांधवाची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या हदगाव व हिमायतनगर विधानसभा निवडणुकी आदिवासी समाज बांधव उच्चं शिक्षित व सक्षम असा एक आदिवासी उमेदवार उभा करणार आहे. यावर एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, यासही तालुक्यात आदिवासी समाज बांधव तयारीला लागले आहेत. आदिवासी समाजाने घेतलेल्या हा एकजुटीचा निर्णय मात्र अनेक भावी आमदाराचे स्वप्न भंग करणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हदगाव हिमायत्तनगर तालुक्यात आदिवासी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे निर्णायक आहे. आदिवासी समाज ज्यांच्या पाठीशी तो उमेदवार विजयी असे समीकरण आत्तापर्यंत अमलात आले असल्याचे बोलले जात आहे. असे असताना देखील निवडणून आलेला उमेदवार हा आदिवासी समाजाच्या प्रमुख गरजांकड...
Girish Mahajan : नांदेड शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : नांदेड शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड महानगर व जिल्ह्यामध्ये एक व तीन सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीने शहराच्या अनेक भागात नुकसान झाले आहेत. ज्यांची नुकसान झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले अशा सर्व लोकांना तातडीची मदत करा असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. लातूर येथील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर व नांदेड दोन्हीही ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पाहणी केली. मंगळवारी त्यांनी लोहा तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली त्यानंतर काल राष्ट्रपती महोदयांच्या दिल्ली येथील प्र स्थानानंतर रात्री उशिरा त्यांनी शहरातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले,त्या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. महानगरातील गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे नुकसान ...
Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली व वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली तसेच चव्हाण कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार मोहनराव हंबर्डे आदी उपस्थित होते....
Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| तालुक्यातील भोसी येथे माजी जी. प. सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांन सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जाणता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की मी व माझे कुटुंबिय आणि भोकर तालुका यांचा अगदी जवळच नात असून माझ्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत आणि मला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर मतदारसंघानी केली आहे त्या मुळे या मतदार संघातील जनतेचे आम्ही उपकार विसरू शकत नाही, तेंव्हा या मतदार संघांच्या विकास कामासाठी मी निधी कधीच कमी पडू देणार नाही तेंव्हा आपले गट तट बाजूला ठेवून मतांचे ध्रुवीकरण(विभाजन ) होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर भारतीय जाणता पार्टीचा उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी व...
Summarize major agricultural losses : शेतीचे मोठे नुकसान सरसकट पंचनामे करा; तात्काळ मदत द्या- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Summarize major agricultural losses : शेतीचे मोठे नुकसान सरसकट पंचनामे करा; तात्काळ मदत द्या- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्ह्यात सर्वच तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी ,तलाठी ग्रामसेवक यांनी मिळून सरसगट पंचनामे करावे .शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. कोणीही वंचित राहू नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी असे आहवान माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे लोहा तालुक्यातील पेनूर शेवडी, पळशी, भेंडेगाव भागातील पिकांच्या नुकसानाची पाहणी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. लोहा तालुक्यात मोठ्या संख्येने मागच्या पावसामुळे मोठे शेतीचे नुकसान झाले त्या संदर्भात आज माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पळशी भेंडेगाव शेवडी पेनुर सह अन्य गावात त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतक...
Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायनगर तालुक्यात मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे पीकाचे प्रचड नुकसान झाले आहे. तसेच थकीत पीक विमा संदर्भात हदगाव विधानसभाक्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा. अष्टीकर यांनी एकत्र बसुन ठोस निर्णय घ्यावा असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे हदगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी केली आहे. त्यांनी दि.3 सप्टेंबर रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 1सप्टेबर2024 च्या राञीपासुन सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने थैमान घातले. तीन दिवसात नदी नाले यांना पुर येवून शेती पिकाचे प्रचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यावर प्रचंड प्रमाणात अर्थिक संकट कोसळले आहे. हदगाव व हिमायनगर तालुक्यातील सर्व शेतक-याच्या शेतीचे पंचनामे करुन त्यांना त्वरीत नुकसानीच मोबदला देण्यात येऊन या संकटातून बाहेर काढणे आवश्यक असल्याची मागण...
BJP district general secretary Gajanan Tuptewar : हदगाव हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या – भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार -NNL

BJP district general secretary Gajanan Tuptewar : हदगाव हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या – भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे करणे करता हदगाव हिमायतनगर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अतिवृष्टी झाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला. या पुराच्या पावसामुळे शेती पिकात पाणी साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, हळद आदींसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल...
Distribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप -NNL

Distribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/नांदेड| हदगाव तालुक्यातील मार्लेगावात नैसर्गिक आपत्तीमुळे १५ घरे उध्वस्त, स्वराज्य पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले असून, शासनाने गावकऱ्यांवर संकटाचे ढग दूर करण्यासाठी भरीव मदत द्यावी अशी मागणी केली आहे. गेल्या तीन दिवस खाली वरून राजाने हजेरी लावून होत्याचे नव्हते केलं आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर मतदार संघातील हदगाव तालुक्यातील मारलेगाव येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत गावातील सुमारे १५ घरे पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गावकऱ्यांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. मारलेगावातील या संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. या किट...
Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी विमानाने आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती. विमानतळावरुन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उदगीर येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने प्रयाण केले....
Draupadi Murmu at Nanded Airport : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

Draupadi Murmu at Nanded Airport : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे भारतीय वायुसेनेच्या विमानाने सकाळी 10.25 वाजता आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती....
error: Content is protected !!