HomeनांदेडDistribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना...

Distribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप -NNL

हदगाव/नांदेड| हदगाव तालुक्यातील मार्लेगावात नैसर्गिक आपत्तीमुळे १५ घरे उध्वस्त, स्वराज्य पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले असून, शासनाने गावकऱ्यांवर संकटाचे ढग दूर करण्यासाठी भरीव मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

गेल्या तीन दिवस खाली वरून राजाने हजेरी लावून होत्याचे नव्हते केलं आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर मतदार संघातील हदगाव तालुक्यातील मारलेगाव येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत गावातील सुमारे १५ घरे पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गावकऱ्यांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

मारलेगावातील या संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. या किटमध्ये आवश्यक अन्नधान्य, किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून गावकऱ्यांना या कठीण प्रसंगी थोडासा आधार मिळू शकेल.

या मदतकार्यादरम्यान माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले, “आपत्तीच्या काळात एकत्र येऊन मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या गावातील नागरिकांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत.” त्यांनी आणखी मदतीचे आश्वासन दिले आहे व सरकारी यंत्रणांकडेही आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

स्वराज्य पक्षाच्या या तातडीच्या मदतीमुळे गावकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्रशासनानेही लवकरात लवकर या गावात पुनर्वसनाचे उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments