police ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन पोलीस अंमलदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्या बदल पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या हस्ते फित लावून पदोन्नती बहाल करून पदोन्नती प्राप्त कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालय येथुन पदोन्नती समितीच्या दि.2 जुलै 25 झालेल्या बैठकीच्या निर्णया नुसार पोलीस अंमलदार यांना या कार्यालयाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदात सेवा जेष्ठते नुसार सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,यापदावर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एका आदेशानुसार पदोन्नती दिली असुन यात ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोहेका संभाजी शेषेराव व्यवहारे,विक्रम बालाजी वाकडे, महंमद मजहर हुसेन शेख यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर पोलिस नायक ते पोलिस हवालदार पदी माधव डफड़े,अमोल भोकरे, यां...









