Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

नांदेड, कृषी
नांदेड| केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने चणा खरेदीसाठी 1 ते 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे एकूण 23 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकपासबूक आदी कागदपत्रके संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी. • तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव, बिलोली (कासराळी), लोहा. • कुंडलवाडी विविध कार्यकारी से.सह.सो. कुंडलवाडी ता.बिलोली. • नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर). • पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, ता.देगलुर. • बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी) ता.मुखेड. • मुखेड फळे व भ...
Shankar Pat competition : हिमायतनगरचा श्री परमेश्वर यात्रेतील पट दणाणला; शंकर पट स्पर्धेने मोडले उत्साहाचे सर्व विक्रम !

Shankar Pat competition : हिमायतनगरचा श्री परमेश्वर यात्रेतील पट दणाणला; शंकर पट स्पर्धेने मोडले उत्साहाचे सर्व विक्रम !

कृषी, नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा नगरीतील ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिर यात्रेत रंगलेली भव्य शंकर पट स्पर्धा यंदा जल्लोष, थरार आणि विक्रमी सहभागामुळे विशेष ठरली. परंपरा, प्रतिष्ठा आणि पराक्रमाचा संगम असलेल्या या सोहळ्याने सलग तिसऱ्या वर्षी “न भूतो न भविष्यती” अशी छाप उमटवत संपूर्ण तालुक्याला रोमांचित केले. स्पर्धेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते शर्यतींचा शानदार शुभारंभ झाला. यावेळी नायब तहसीलदार श्री. पठाण, मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी आनंता देवकते तसेच शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्यामसुंदर पाटील, कोशाध्यक्ष प्रवीण शिंदे, सहसचिव गजानन हार्डपकर, नारायण माने आदीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सकाळी दहापासूनच पटाच्या मैदानावर प्रेक्षकांचा अक्षरशः महासागर उसळला होता. धुळीचे लोट उडवत झं...
Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेली पारंपरिक पशुप्रदर्शन स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. देशी बैलजोडी गटातून भीमराव लालबा अडबलवाड यांच्या ‘ढवळ्या’ बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला, यावेळी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना आकर्षक सजावटीसह प्रदर्शनात उभे केले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्व जनावरांची सखोल तपासणी करून उत्कृष्ट पशूंची निवड केली. देशी बैलजोडी गट - भीमराव लालबा अडबलवाड यांच्या ‘ढवळ्या’ बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. मारोतराव रामराव सूर्यवंशी यांच्या बैलजोडीने द्वितीय, तर तेजस आनंदराव मिराशे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला या विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. देशी वळू गट - हणमंता राजाराम यांच्या वळू...
District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अधिनियम 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुहेरी परवानगी प्रक्रिया टळणार असून नागरिकांची वेळ व आर्थिक बचत, वार्षिक करपद्धती ऐवजी सुलभ एकरकमी अधिमूल्य, प्रशासनात पारदर्शकता व सुसूत्रता राहणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून 31 डिसेंबर 2025 पासून लागू असलेल्या सुधारणा तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या अधिनियमान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा अधिनियम 2025 (57/2025) अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलमे 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड व कलम 44, 44 अ, 45, 46 व 47 अ वगळण्यात आली आहेत. ...
Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

नांदेड, कृषी, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, यवतमाळ, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी...
Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर

Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल  मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे दुधाळ जनावरे अनुदानाच्या प्रश्नावरून प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. तब्बल ४० हून अधिक शेतकरी सोमवारपासून आमरण उपोषणावर बसले असून, मंगळवारी दुसरा दिवस पूर्ण झाला असून, आज बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ठोस निर्णयाऐवजी केवळ “उपोषण मागे घ्या” अशी विनवणी केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाच्या प्रधानमंत्री कृषी विकास योजना अंतर्गत मंजूर दुधाळ जनावरांच्या अनुदानाची रक्कम मागील चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भातील बाजारात जनावरे खरेदी केली; परंतु उर्वरित अनुदान खात्यात जमा झालेच नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत अडकले आहेत. परिणामी, थकबाकी वाढल्याने...
Strom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

Strom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

कृषी, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी ज्वारी, गहू आदी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. विशेषतः पवना येथील शेतकरी अवधुत परमेश्वर तमलवाड यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतातील ज्वारी व गव्हाचे पीक आडवे पडून संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....
Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पोटा सर्कलमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन खरेदी करूनही अनुदानाची रक्कम न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हिमायतनगर येथील संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. माहितीनुसार, तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील सुमारे ४५ लाभार्थ्यांची योजना मंजूर झाली होती. दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित जनावरांच्या बाजारातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र त्यानंतर आजतागायत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकी सुमारे २५०० रुपयांपर्यंत रक्कम खर्च करून पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून ...
Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा ही पिके पावसाच्या तडाख्यामुळे आडवी पडली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापून शेतात व खळ्यावर ठेवलेला हरभरा भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून काही ठिकाणी फळगळ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच नुकसानीत होता. रब्बी हंगामातील उत्पादनातून नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व फळबागांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत स...
Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मौजे पार्डी येथे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना वीज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशाखा सचिन येलकेवाड (वय अंदाजे ३० वर्षे) या शेतात हळद काढणीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली. तलाठी संजय बिऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच जोरदार कडकडाटासह वीज कोसळली. त्यात विशाखा येलकेवाड या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पार्डी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. येलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. घटनेची माह...
error: Content is protected !!