Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bull Pola festival is celebrated with enthusiasm in Bhokar : भोकर मध्ये बैल पोळा सण उत्सहात साजरा -NNL

Bull Pola festival is celebrated with enthusiasm in Bhokar : भोकर मध्ये बैल पोळा सण उत्सहात साजरा -NNL

नांदेड, कृषी
भोकर| तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. दोन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने नदी नाले तुडुंब भरले असून देखील बैल पोळ्यासाठी बाजारपेठ साजल्या होत्या. आजही पावसाने दिवसभर हजेरी लावल्याने बैल पोळा सणाच्या उत्साहात तसूभरही कमी झाला नाही तर उलट शेतकरी आपल्या मित्राला म्हणजेच सर्जा राजाला स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीं बेरंगी झुल टाकून लग्नासाठी मंदिर परिसरात आणून लग्न लावण्या आले. त्यानंतर आपापल्या घरासमोर त्यांची विधिवत पूजा आरती करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली यात भोकर येथील सधन शेतकरी तथा उदयोजक वसंतराव पाटील आष्टीकर यांनी सहकुटुंब आपल्या सर्जा राजा ची आपल्या घरी पूजा, अर्चा करून त्यांना पुरणपोळी चा नैवेद्य भरवला....
Nanded heavy rain ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; 25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला -NNL

Nanded heavy rain ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; 25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला -NNL

नांदेड, कृषी
·        नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे ·        उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरुवात ·        93 पैकी 45 मंडळामध्ये धो-धो पाऊस ·        नांदेड शहरात सरासरी 125 मीमी पाऊस ·        पाटबंधारे विभागाची पूर नियंत्रणासाठी पराकाष्ठा ·        पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा नांदेड, अनिल मादसवार। गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.  25 जनावरे मृत्युमुखी 25 जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास शेतीचे व जान...
Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

कृषी, नांदेड
शिवणी,भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील शिवणी येथे बैलपोळा भर पाऊसात उत्साहात साजरा सोमवारी सकाळपासून जोराचा पाऊस चालू होता त्यामध्ये बळीराजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या बैलाला सजवून गावात बैलपोळ्यासाठी घेऊन आला पोळ्याची सुरुवात सोमवार दुपारी 4.30 मिनिटांनी पोळा फिरण्यास सुरुवात झाली. जुन्या परंपरेनुसार आजही प्रथम बैल जोडी फिरवण्याचा मान गावातील मानकरी शंकरराव देशमुख यांना असतो त्यानंतर गावातील सर्व शेतकरी आपले बैल मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालतात यावर्षी बैलपोळ्याला तुफान पाऊस झाल्यामुळे भर पाऊसात पोळा उत्साहात साजरा केला हा पोळा सण साजरा करण्यासाठी गावातील सरपंच ,उपसरपंच , पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी उपस्थित होते...
Shivani apparaopeth ; शिवणी अप्पारावपेठ परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी मागील दोन दिवसात १७७ मिलिमीटर पावसाची नोंद -NNL

Shivani apparaopeth ; शिवणी अप्पारावपेठ परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी मागील दोन दिवसात १७७ मिलिमीटर पावसाची नोंद -NNL

कृषी, नांदेड
शिवणी/ अप्पारावपेठ, भोजराज देशमुख। परिसरात दि.३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा अतिवृष्टी परिस्थीती निर्माण झाली आहे यामुळे या परिसरातील नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किनवट तालुक्यातील शिवणी सह अप्पारावपेठ परिसरात दि ३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरामुळे पिके वाहून नेली तर अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. तर ३१ आगस्ट च्या दिवशी झालेल्या पावसाची नोंद १ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत १०२ मिलीमीटर ची नोंद झाली असून १ सप्टेंबर सकाळी पासून दोन सप्टेंबर सकाळपर्यंत ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकंदरीत दोन दिवसांच्या पावस...
Good news for cotton and soybean farmers ; सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! – NNL

Good news for cotton and soybean farmers ; सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! – NNL

कृषी, नांदेड
मुंबई | सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणी बाबतीत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे सं...
Collector Abhijit Raut ; शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

Collector Abhijit Raut ; शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्व सूचना कळवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरून पिके जलमय होऊन, पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वरील नुकसानीची भरपाई ही पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत देण्यात येते. वरील कारणांमुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येत...
guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

कृषी, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज  दिले आहे. नांदेड मधील अतिवृष्टीच्या संदर्भात आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील 93 मंडळापैकी 65 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे.मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे त्यांनी निर्देश दिले आहे. महानगर...
Municipal CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी भागात नदीच्ये पाणी अनेक घरात, पाच अपातीनिवारण केंद्र.. – NNL

Municipal CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी भागात नदीच्ये पाणी अनेक घरात, पाच अपातीनिवारण केंद्र.. – NNL

कृषी, नांदेड
नवीन नांदेड| गेल्या दोन ते तिन दिवसांपासून संततधार पावसामुळे गोदावरी नदीला महापुर आला असुन विष्णुपूरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला महापुर आल्याने नांदेड मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ मधील नदी काठाचा लगत असलेल्या अनेक वसाहती मध्ये मध्यरात्री अचानक पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने जुना कौठा ,वसरणी,यशोधरा नगर वसाहती मध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार उपयोगी वस्तू नासधूस झाली असुन मध्यरात्री नागरीकांनी सुरक्षीत स्थळी धाव घेतली तर सकाळी वसाहती मध्ये मोठया प्रमाणात पाणीच पाणी झाले. महसूल व मनपा प्रशासनाने पाहणी केली असून मनपा प्रशासनाने पाच अपती निवारण केंद्र स्थापन केली असून जिल्हा परिषद शाळेत तात्पुरती व्यवस्था केली असून सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक, वसुली लिपीक, स्वच्छता निरीक्षक य...
Bailpola festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३७ गावात बैलपोळा सण ऊत्साहात साजरा.. – NNL

Bailpola festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३७ गावात बैलपोळा सण ऊत्साहात साजरा.. – NNL

कृषी, नांदेड
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ३७ गावात शेतकरी राजाने जल्लोष , व उत्सवामध्ये गावातील हनुमान मंदिरात प्ररदर्शना मारून सामुदायिक लग्न सोहळा व महाआरती करून साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,प्रतिष्ठात नागरीक, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष, यांच्या सह महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैलपोळा सणाच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतअसलेल्या तुप्पा,जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी,नागापूर, राहेगाव, वांगी, पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन,वाघाळा,असदवन,पिंपळगाव ,यासह जवळपास ३७ गावात विधीवत पुजन सामुदायिक लग्न सोहळा,महाआरती ने बैलपोळा सण ऊत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असलेल्या बाभुळगाव य...
error: Content is protected !!