Homeक्राईमनांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; ८५३ कारवायांत ७.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; ८५३ कारवायांत ७.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-२’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या पंधरवड्यात परिक्षेत्रात ८५३ कारवाया करून १,३१५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवायांमध्ये आरोपींकडून तब्बल ७ कोटी ९७ लाख ६१ हजार ७२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा, मटका-जुगार, दारूबंदी कायदा, शस्त्र अधिनियम तसेच इतर कायद्यांनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यात २४२, परभणीत २१२, हिंगोलीत १८७ तर लातूर जिल्ह्यात २१२ कारवाया करण्यात आल्या.

जिल्हा गुटखा मटका/जुगार दारू शस्त्र अधिनियम इतर
नांदेड 9 47 126 14 46
परभणी 4 42 151 2 13
हिंगोली 2 35 118 6 26
लातूर 3 48 132 4 25
एकूण 18 172 527 26 110

यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सर्वाधिक ५२७ कारवाया, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १७२ कारवाया, तर इतर कायद्यांखाली ११० कारवाया करण्यात आल्या. गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम १२३ भारतीय न्याय संहितेनुसार १८, तर शस्त्र अधिनियमांतर्गत २६ कारवाया झाल्या आहेत.

पुढील पंधरवड्यात मोहीम अधिक तीव्र – परिक्षेत्रात सुरू असलेली ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-२’ पुढील पंधरवड्यात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी संबंधित घटकांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

‘खबर’ हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन – अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध दारू, गुटखा, जुगार, मटका, अंमली पदार्थ किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments