Thursday, May 14

Tag: Goods

Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा सपाटा; ८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा सपाटा; ८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड |  पोलीस उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार नांदेड परिक्षेत्रात अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. लातूर व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये रोख रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात २७ जानेवारी २०२६ रोजी अहमदपूर तालुक्यातील सावळा परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई करत १ लाख ५ हजार २०० रुपये रोख व १२ मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच नांदेड शहरातील इस्लामनगर परिसरात ३० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत २ लाख ३४ हजार १०० रुपये रोख व २७ मोबाईल असा मुद्देमाल जप्त झाला. याशिवाय इतर ठिकाणच्या कारवायांमध्येही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य, एक गावठी अग्निशस्त्र व जिवंत...
error: Content is protected !!