क्राईमनांदेड

Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

नांदेड| पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने संशयित राशनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक अंदाजे 24 लक्ष 85 हजार रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात अवैद्य धंद्याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु असताना देखील अवैद्य धंदे सुरूच सल्याचे नुकताच करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 19/09/2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन नायगांव हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन नांदेड ते नायगांव जाणा-या तहसिल कार्यालय नायगांव जवळ एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8510 थांबवुन सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात तांदुळ व गव्हाने भरलेले 80 कटटे, किंमत अंदाजे 1,10,000/- रु चा रेशनचा संशयित माल मिळुन आला.

तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 26 BE 4246 थांबवुन चेक केले असता त्यामध्ये तांदळाने भरलेले 60 कटटे किं.अं. 75 हजार रुपयाचा माल व दोन्ही वाहनांची मिळुन किं.अं. 23 लक्ष रुपये असा एकुण 24 लक्ष 85 हजार रुपयांचा संशयित माल मिळुन आल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नायगांव येथे लावण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री. खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, पोह/605 पोतदार, पोह/335 मुंढकर, पोना/580 तलवारे, पोकॉ/2864 येंगाले, पोकॉ/2614 वाघमारे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button