किनवट,परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील नगाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर 05 ऑक्टोंबर रोजी आगमन झाले.
त्याच विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांना स्वागताची संधी मिळाल्याने किनवट माहूर मतदार संघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांपैकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मात्र कायम राहिली.
भाजपामध्ये जवळपास डझनभर नेते उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असून काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून दोन्ही नेत्याच्या कार्यकर्त्यांमधून माझ्याच नेत्यांना तिकीट भेटेल असा अंदाज बांधण्यास मतदारसंघात सुरुवात झाली आहे.
दावेदार डझनभर पण टिकीट एकांनाच मिळणार
त्यातच भाजपात नव्याने प्रवेश केलेले प्रकाश टारपे हे सुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे पहावयास मिळते आंध समाजाचा एक प्रमाणीक चेहरा म्हणून प्रकाश टारपे यांच्याकडे बघितले जाते. त्यातच भाजपाचे जैष्ठ नेते धरमसिंग राठोड, संध्याताई राठोड, अशोक नेमानीवार, प्रा, किसन मिराशे,ॲड अविनाश राठोड, सचिन नाईक, यांनीही पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागितली.
मात्र भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्यावर महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कृपादृष्टी असल्याने सध्या स्थितीत तरी उमेदवारी संदर्भात अशोक पाटील सूर्यवंशी यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते आणि नांदेड विमानतळावर अशोक पाटील सूर्यवंशी हे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करत अस्तानाची हास्य मुद्रा बरेचसे काही सांगून जाते.