किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर राहणाऱ्या लोकांना प्रथम उपचार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र हेच प्राथमिक आरोग्य केंद्र जीर्ण अवस्थेत आले असून या परिसरात सर्व साधारण पाऊस झाला तरी अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारती गळत असल्याचे ताजे चित्र बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहावयास मिळत आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हे मोठ्या प्रमाणात गळत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर येथिल औषधी, आरोग्य साहित्य हे झाकून ठेवावे लागत आहे आणि गळतीच्या ठिकाणी टोपले ठेवावे लागत आहे.अशा परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाची तपासणी करून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी व स्टॉप कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
बोधडी येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो त्याचबरोबर रेल्वे स्टेशन असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या रेल्वेने स्टॉप असल्याकारणाने येथे नेहमीच वर्दळ असते त्याचबरोबर आजूबाजूच्या खेड्यातील लोक या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र हे जनसामान्याचे आरोग्य केंद्र असून सर्वसामान्य नागरिकांना येथे या केंद्रातून प्रथम उपचार केले जातात.
बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे जीर्ण अवस्थेत झाल्याने नव्याने येथे बांधकामास परवानगी देऊन नवी ईमारत उभारावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्ष अनुसयाबाई सतीश जमादार यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)