Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर राहणाऱ्या लोकांना प्रथम उपचार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र हेच प्राथमिक आरोग्य केंद्र जीर्ण अवस्थेत आले असून या परिसरात सर्व साधारण पाऊस झाला तरी अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारती गळत असल्याचे ताजे चित्र बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहावयास मिळत आहे.
बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हे मोठ्या प्रमाणात गळत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर येथिल औषधी, आरोग्य साहित्य हे झाकून ठेवावे लागत आहे आणि गळतीच्या ठिकाणी टोपले ठेवावे लागत आहे.अशा परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाची तपासणी करून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी व स्टॉप कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत...
