नांदेडसोशल वर्क

Com Gangadhar Gayakwad : इमारत व बांधकाम कामगार घोटाळ्याचा देखावा नकॊ ; अधिकारी – कर्मचाऱ्यांनीच केला शकडो कोटींचा घोटाळा, फोजदारी गुन्हे दाखल करा – कॉ.गंगाधर गायकवाड

नांदेड| कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर यांनी मोठा गाजावाजा करीत बांधकाम कामगार नोंदणी, नूतनिकरण आणि दावे तसेच लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर व ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

परंतु त्यांच्याच खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि काही कार्यकर्ते, नेते मुख्य सूत्रधार असल्यामुळे राज्यभर चर्चेत असलेला बांधकाम कामगार घोटाळा दाबून टाकण्याची नामुष्की कामगार मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली आहे. सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी नांदेड जिल्ह्यात झालेल्या घोटाळ्यातील अनियमितता,हेराफेरी, बोगस नोंदणी आणि संगणमताने केलेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या संदर्भाने पुरावे नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे तसेच मंत्रालयात सादर केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉ. गंगाधर गायकवाड यांना ईमेल द्वारे लेखी स्वरूपात माहिती कळविली असून कागजपत्राची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असून राज्यभर व्याप्ती आहे.

आमदार खासदारांनी निवडणुकीपूर्वी स्वतः मंडप टाकून ग्रामसेवक, नोडल अधिकारी, नोंदणी अधिकारी व संबंधित इतरांना बेकायदेशीररित्या मंडपात बोलावून ९० दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास भाग पाडले, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी, नोंदणी अधिकारी यांना तातडीने अर्ज मंजूर करण्यास भाग पाडले, सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सर्व प्रक्रियेला मंजुरी दिली आणि. हजारो कामगारांची नोंदणी, नूतनिकरण, लाभ सोईनुसार देण्यात आला.

ह्यामध्ये मुख्यता कामगार सुविधा केंद्र चालवीणारे कंत्राटी कर्मचारी, कामगार कार्यालयातील कायम कर्मचारी, सरकारी कामगार अधिकारी, नोंदणी अधिकारी यांनी संगणमताने हजारो रुपये लाचेपोटी घेऊन नोंदणी केली आहे. ज्या तालुक्यातील एजन्टांनी अर्थपूर्ण व्यवहार बरोबर केला नाही. त्या तालुक्यातील नोंदणी, नूतनिकरण शून्य दिसून येत आहे. विशेषता मंत्री फुंडकरांनी नियुक्त केलेल्या समिती मधील अधिकाऱ्यांनीच चर्चेत असलेल्या बोगस कामगारांचे अर्ज मंजूर केले आहेत.

मोठा गाजावाजा करीत फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या मंत्री महोदयानी कामगार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुराव्याणीशी मुख्यमंत्री, कामगार मंत्री, विकास आयुक्त, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तातडीने कार्यवाही केली नाही तर व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे देखील कॉ.गायकवाड यांनी कळविले आहे.

इमारत व बांधकाम कामगार निधी घोटाळा, भांडे व साहित्य संच वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली यासाठी सीटू कामगार संघटनेने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर अनेक मोर्चे काढलेले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले लवकरच दूध का दुध और पाणी का पाणी करतील अशी अपेक्षा कॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button