Ujjwala Padlawar : क्रांतिसिंह नानापाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड
नांदेड| बीडमध्ये दि.३ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने निवडक दहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये नांदेड येथील कामगार चळवळीतील लढाऊ साथी कॉ. उज्वला पडलवार यांचा समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केजमध्ये सुरू असलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचा पुरस्कार सोहळा बीडमध्ये घेऊन आले ही कौतुकाची बाब आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य चंद्र-सूर्य असेपर्यंत जनमानसात जिवंत राहील.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.३) शेतकरी कामगार पक्ष व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण आणि क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.बजरंग सोनवणे हे होते.
शेकाप...




