Wednesday, May 13

Tag: a scam worth hundreds of crores

Com Gangadhar Gayakwad : इमारत व बांधकाम कामगार घोटाळ्याचा देखावा नकॊ ; अधिकारी – कर्मचाऱ्यांनीच केला शकडो कोटींचा घोटाळा, फोजदारी गुन्हे दाखल करा – कॉ.गंगाधर गायकवाड

Com Gangadhar Gayakwad : इमारत व बांधकाम कामगार घोटाळ्याचा देखावा नकॊ ; अधिकारी – कर्मचाऱ्यांनीच केला शकडो कोटींचा घोटाळा, फोजदारी गुन्हे दाखल करा – कॉ.गंगाधर गायकवाड

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर यांनी मोठा गाजावाजा करीत बांधकाम कामगार नोंदणी, नूतनिकरण आणि दावे तसेच लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर व ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांच्याच खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि काही कार्यकर्ते, नेते मुख्य सूत्रधार असल्यामुळे राज्यभर चर्चेत असलेला बांधकाम कामगार घोटाळा दाबून टाकण्याची नामुष्की कामगार मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली आहे. सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी नांदेड जिल्ह्यात झालेल्या घोटाळ्यातील अनियमितता,हेराफेरी, बोगस नोंदणी आणि संगणमताने केलेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या संदर्भाने पुरावे नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे तसेच मंत्रालयात सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉ. गंगाधर गायकवाड यांना ईमेल द्वारे लेखी स्वरूपात...
error: Content is protected !!