नांदेडलाइफस्टाइल

Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी – NNL

नांदेड| गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या‎‎ पावसामुळे ‎‎शहरातील श्रीनगर भागातील रस्त्यावर‎‎ एक झाड‎‎ या ठिकाणाहून जाणाऱ्या‎‎ दुचाकीवर ‎‎कोसळले आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील १० वर्षीय‎ बालकाचा मृत्यू झाला आणि आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.‎ हि घटना रविवारी‎ दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‎घडली. ‎यश गुप्ता वय १० असे मयत बालकाचे‎ नाव आहे.‎ घटना घडताच नागरिकांनी ‎धाव घेऊन दुचाकीवर पडलेले झाड‎ उचलून जखमींना बाहेर काढले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात‎ उपचार सुरु आहेत.

06 Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी - NNL

गत काही दिवसांपासून नांदेड शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरुच आहे. नदी-नाले ही‎दुथडी भरून वाहत आहेत.‎ शहरातील अनेक भागात रस्त्यांवर ‎पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची जुनी झाडे जीर्ण होऊ लागली आहेत. शहरातील बाबानगर भागातील पाणीपुरीचा व्यवसाय करणारे पंकज गुप्ता हे पत्नी पुजा आणि मुलगा यश वय १० वर्ष यांच्यासह दुचाकीवर जात होते.

04 Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी - NNL

नांदेड‎ शहरातील श्रीनगरच्या मुख्य रस्त्यावर ‎वाहतूक सुरू असताना, पावसामुळे मुळापासून एक झाड उखडले आणि नेमके त्यांच्या दुचाकीवरच कोसळले. ही घटना रविवारी दि.२८ रोज दुपारी १२ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे तसेच मनपाचे अग्निशमन अधिकारी के डी.दासरे, आर.एम.गायकवाड, साजीद, मोरे, ताटे, गिते, लांडगे, खेडकर यांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेत जखमी पंकज व पूजा यांना येथील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या यशचा मृत्यू झाल्याची माहिती भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी दिली.

03 Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी - NNL

‎मूळचे राजस्थानचे असणारे गुप्ता‎ कुटुंबीय २० वर्षांपासून नांदेड ‎शहरात पाणीपुरी‎ विक्रीचा व्यवसाय करतात. रविवार असल्याने ते खरेदीसाठी बाहेर पडले‎ होते. घरी परत येताना ही दुर्घटना‎ घडली. त्यात गुप्ता यांचा एकुलता ‎एक मुलगा यशचा मृत्यू झाला.

02 Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी - NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!