Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL
लेख September 30, 2024

global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

महाराष्ट्र, २९ सप्टेंबर २०२४: सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्राला नवा मार्ग दाखवण्याची क्षमता असते. आनंद माहूरकर हे या दुर्मिळ श्रेणीतील एक दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आपल्या ध्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून काही क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. (Findability Sciences) फाइंडॅबिलीटी सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून माहूरकर यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रात ‘एन्टरप्राईज एआय’, आणि ‘बिझनेस प्रोसेस को – पायलट’ या उत्पादनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली कंपनी उभी केली आहे. हा प्रवास जिद्द, गहन अंतर्दृष्टी, सूक्ष्म दृष्टीकोन आणि भविष्य घडविण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित होऊन झाला आहे.

 साधरणते पलीकडील दृष्टी: माहूरकरांचा प्रवास डेटा आणि एआयच्या प्रचंड क्षमता लक्षात घेतल्याने सुरू झाला. तंत्रज्ञान आणि व्यवसायात दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या माहूरकरांनी लवकरच जाणून घेतले की उद्योग जगतात मोठ्या प्रमाणात डेटा निर्मिती होत आहे, परंतु या डेटाचा उपयोग करुन व्यवसायाचे मूल्य वाढवण्याची कुठलीही साधने त्यांच्याकडे नाहीत आणि आगामी काळात – एआयमुळे डेटा वापरून नवी कार्यक्षमता आणि सुधारक नाविन्यपूर्णता निर्माण होऊ शकते.

फाइंडॅबिलीटी सायन्सेसची स्थापना: २०१० मध्ये त्यांनी फाइंडॅबिलीटी सायन्सेसची स्थापना केली. जी एक डेटा तंत्रज्ञान कंपनी असून अनेक व्यवसायांना मोठ्या डेटाच्या गुंतागुतीतून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशीलआहे. सुरुवातीच्या काळात माहुरकरांनी डेटा उपयुक्त आणि विचारार्ह बनु शकेल अशा उपाययोजना विकसित केल्या. परंतु एआयच्या प्रचंड क्षमतेचा, सामर्थ्याचा शोध लागल्यावर त्यांनी निर्णायक विचार अंमलात आणला ज्यामुळे कंपनीची भविष्यातील दिशा निश्चित झाली तो म्हणजे ‘जनरेटिव्ह एआयचे एकत्रीकरण’.

२०१८ पर्यंत माहुरकरांची दूरदृष्टी फलद्रूप झाली. त्यांनी फाइंडॅबिलीटी सायन्सेसला एआय आधारित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेषत्वाने, जनरेटिव्ह एआय केंद्रित तंत्रज्ञानाच्या विश्वात नेले. या बदलामुळे कंपनी जागतिक एआय क्रांतीच्या अग्रस्थानी आली. जनरेटिव्ह एआयमुळे फाइंडॅबिलीटी सायन्सेस आता केवळ डेटा विश्लेषणच नव्हे तर नवे दृष्टीकोन आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता उपलब्ध करून देत आहे ज्यामुळे उद्योगांना स्पर्धात्मक फायदाही मिळत आहे.

जागतिक प्रभावाचा उदय:  माहूरकरांच्या नेतृत्वात फाइंडॅबिलीटी सायन्सेस कंपनीने जलद गतीने आपले जागतिक अस्तित्व वृद्धिंगत केले. आयबीएम सारख्या तंत्रज्ञानातील दिग्गज कंपन्याशी धोरणात्मक भागीदारी करून आणि विविध उद्योगांना एआय उपाययोजना पुरवून कंपनीने आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे ख्याती मिळविली. बदलणाऱ्या बाजारातील मागण्या समजून घेत त्यानुसार स्वतः लाही बदलत ठेवणे आणि त्याचवेळी आपली मूलभूत दिशा न बदलणे हे माहूरकरांच्या यशाचे गमक आहे.

फाइंडॅबिलीटी सायन्सेसच्या यशामागे फक्त तंत्रज्ञानच नव्हे तर माहुरकरांनी सहकार्य आणि सांस्कृतिक एकात्मतेवर दिलेला भर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कंपनीच्या एआय उपाययोजना विविध बाजारांच्या गरजांसाठी तयार करण्यात आल्या आणि कंपनीचे कामकाज उत्तर अमेरिका, आशिया आणि युरोपमध्ये पसरले आहे.

एआय क्षेत्रातील विचारवंत: माहुरकरांचा प्रभाव त्यांच्या कंपनी पलिकडेही विस्तारला आहे. एआय क्षेत्रांतील विचारवंत म्हणून त्यांनी एआयचा नैतिक वापर, डेटा गोपनीयता आणि भविष्यातील कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या विचारांची औद्योगिक सहकाऱ्यांमध्ये व सरकारी आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये  मागणी असते. ज्यामुळे ते एआय समुदायातील आदरणीय व्यक्तिमत्व ठरले आहेत.

दूरदृष्टीने प्रेरित एआयचे भवितव्य: फाइंडॅबिलीटी सायन्सेस जनरेटिव्ह एआयच्या सामर्थ्याच्या मर्यादा पुढे नेत राहतील हे निश्चित असले तरी माहूरकर नाविन्याचा ध्यास कायम ठेवून काम करत आहेत. त्यांच्यामते एआय उद्योगांना क्रांतिकारक बनवेल. परंतु खरा परिणाम एआयचा वापर करून प्रत्यक्ष जगातील समस्या, अडचणी आपण कशा सोडवू यावर असेल.

आनंद माहुरकरांची कथा केवळ तांत्रिक नवपरिवर्तनाची नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व आणि आभाळाएवढी स्वप्ने पाहण्याच्या धाडसाची आहे, ध्येयवेड्या हिंमतवान माणसाची आहे. अगदी साध्या सुरुवातीपासून ते एक जागतिक एआय साम्राज्य स्थापन करणारे आनंद माहूरकर यांनी दर्शविले आहे की, योग्य दृष्टीकोन आणि नाविन्याचा सतत ध्यास घेऊन, पाठपुरावा करून काहीही शक्य आहे.

Bhoomiputra of Marathwada created a global AI empire
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSatyajit Tipreswar : आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान -NNL
Next Article Dr. Gopchde : सर्वांनी एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभेसह नऊ विधानसभांवर महायुतीचा झेंडा निश्चित-खा.डॉ.गोपछडे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

Lakhishah Banjara : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL

August 6, 2024

Manasi ingole : मानसी इंगोले दक्षिण कोरिया विद्यापीठाच्या प्रेझेंटेशन अवार्डने सम्मानित

July 10, 2025

Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

January 1, 2025

ration of happiness : गौरी गणपती उत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना; ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांची थट्टा -NNL

September 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

Indian Medical Association ; इंडियन मेडीकल असोशिएसन च्या वतीने मतदात्यांना घवघवीत सूट मतदान करा सूट मिळवा – आयएमए – NNL

वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

Supreme Court directions : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या श्वानांवर जिल्हा परिषदेची अंमलबजावणी मोहीम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?