global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL
महाराष्ट्र, २९ सप्टेंबर २०२४: सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्राला नवा मार्ग दाखवण्याची क्षमता असते. आनंद माहूरकर हे या दुर्मिळ श्रेणीतील एक दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आपल्या ध्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून काही क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. (Findability Sciences) फाइंडॅबिलीटी सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून माहूरकर यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रात 'एन्टरप्राईज एआय', आणि 'बिझनेस प्रोसेस को – पायलट' या उत्पादनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली कंपनी उभी केली आहे. हा प्रवास जिद्द, गहन अंतर्दृष्टी, सूक्ष्म दृष्टीकोन आणि भविष्य घडविण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित होऊन झाला आहे.
साधरणते पलीकडील दृष्टी: माहूरकरांचा प्रवास डेटा आणि ए...
