मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL

नांदेड। उद्या दि. 8 जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर सुरू करणार आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधून हजारोच्या संख्येने समाजबांधव अंतरवाली कडे कुच करणार असल्याची माहिती मराठा सेवक श्याम वडजे पाटील यांनी दिली आहे.


मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी नऊ महिन्यापासून अंतरवाली सराटी या गावात चालु असणारं आंदोलन अनेक वेळा सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सरकारला काय यश मिळाले नाही. शेवटी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा जोरदार फटका बसला असुन, 45 प्लस जागेवर आपला दावा करनारे सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले. हे सामाजिक आंदोलनाचे राजकीय यश असेच म्हणावे लागेल.


कारण या सामाजिक आंदोलनातून मराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या सरकारला कुठेतरी जागा दाखवण्याची गरज समाज व्यक्त करीत होता आणि तसंच घडलं सुद्धा. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत मराठा समाज उतरणार नाही. पण आपल्या मताची किंमत त्यांना दाखवल्या शिवाय सोडणार सुद्धा नाही असं सुचक वक्तव्य करुण सरकारला एक प्रकारचा इशाराच दिला होता आणि त्याचा प्रत्यय लोकसभेला दिसुन सुद्धा आला आहे.


आता विधानसभेला सुद्धा तीच वेळ सरकारवर येऊ द्यायची नसेल तर तात्काळ “सगेसोयरे” कायद्याची अंमलबजावणी करा, कुणबी मराठा, मराठा कुणबी, मराठा हे एकच आहेत असा 2004 च्या शासन निर्णयात सुधारणा करुण त्याची अंमलबजावणी करा या प्रमुख मागणीसाठी उद्या दि. 08 जून रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे परत एकदा अतिशय कठोर उपोषणास बसत आहेत तसं आवाहन त्यांनी महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला केले आहे. त्यांच्या आवाहणाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने अंतरवाली कडे कुच करणार आहे अशी माहिती नांदेड जिल्हाचे मराठा सेवक शिवश्री श्याम पाटील वडजे यांनी दिली.




