Homeनांदेडअतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

अतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

नांदेड। सीटू आणि जमसंने लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी यास हलक्यात घेत आहेत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपयाची मागणी जिल्हाधिकारी आणि शासनाकडे केली आहे.

विशेष म्हणजे वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ठराव शासनास दिला आहे. आणि पेसा ग्रामपंचायतचा ठराव विनविलंब मंजूर करून अंमलबजावणी करणे कायदा आहे परंतु अद्याप कारवाई झाली नाही. तसेच शेणी ता.अर्धापूर येथील सालगडी असलेल्या सौ. सुनीता आणि संजय हातागळे यांच्या १८ वर्षीय विद्यार्थी असलेल्या मुलाचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करून सीडीआर तपासून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पीडित आई वडिलांचे उपोषण आहे. त्यांच्या मागण्या सोडवाव्यत.

पुयनी येथील महानंदा लोंढे यांच्या १७ वर्षीय मुलीचे एक महिन्यापूर्वी अपहरण झाल्याची एफआयआर नोंद रेल्वे पोलीस स्थानकात आहे. परंतु अद्याप शोध लागत नाही त्या अपहृत मुलीचा शोध घेण्यात यावा.या प्रमुख मागण्यासाह इतरही प्रलंबीत मागण्या अपूर्ण आहेत. मागण्या सोडविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका आणि शहर कमिटी दि.१० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरु करणार आहे. जो पर्यंत मागण्या सुटणार नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय माकप तालुका कमिटीने घेतला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.गंगाधर खुणे, कॉ.गजानन गायकवाड आदिजण करणार आहेत. गरज पडल्यास या प्रलंबीत मागण्या इंडिया आघाडीच्या खासदार आणि आमदारांच्या निदर्शनास आणून देत त्यांची मदत देखील घेणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments