मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL
नांदेड। उद्या दि. 8 जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर सुरू करणार आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधून हजारोच्या संख्येने समाजबांधव अंतरवाली कडे कुच करणार असल्याची माहिती मराठा सेवक श्याम वडजे पाटील यांनी दिली आहे.
मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी नऊ महिन्यापासून अंतरवाली सराटी या गावात चालु असणारं आंदोलन अनेक वेळा सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सरकारला काय यश मिळाले नाही. शेवटी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा जोरदार फटका बसला असुन, 45 प्लस जागेवर आपला दावा करनारे सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले. हे सामाजिक आंदोलनाचे राजकीय यश असेच म्हणावे लागेल.
कारण या सामाजिक आंदोलनातून मराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या सरकारला कुठेतरी जागा दाखवण्याची गरज समाज व्यक्त करीत होता आणि त...
