नांदेडधार्मिकव्हिडीओ

Om Namah Shivaya : “ॐ नमः शिवाय” नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाची “ओम नमः शिवाय” (Om Namah Shivaya) नामजाप यज्ञाने सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी यज्ञात सहभाग घेतला असून, दिनांक २७ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत संगीतमय भागवत कथा, संगीतमय संत चरित्र कथा आणि संगीतमय शिवपुराण कथा असे विविध धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी धार्मिक सत्संग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

1008854400 Om Namah Shivaya : "ॐ नमः शिवाय" नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

“ॐ नमः शिवाय” या मंत्राचा नामजप हेच जीवनाचं खरा सार असून, यात सर्वानी सहभागी होण्याचं आवाहन दत्त संस्थान पिंपळगाव येथील परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केलं होत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रावण मासाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दिनांक २५ जुलै पासून श्री परमेश्वर मंदिरातीलं (Shri Parameshwara Temple) शिवपती मंदिराच्या सभागृहात अखंड “ओम नमः शिवाय” नाम जाप यज्ञाला सुरुवात झाली आहे. या नामजाप यज्ञात रात्री सहा ते सकाळी सहा या वेळात पुरुष मंडळी तर सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत माहिला मंडळी सहभागी होत आहेत. श्रावण मासाची सुरुवात ते शेवटच्या दिवशीपर्यंत अखंडित ओम नमः शिवाय नामाचा जाप चालणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या यज्ञात शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिला पुरुष भाविकांनी सहभागी होऊन तिसऱ्या वर्षीचा यज्ञ पूर्ण करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

1008850874 Om Namah Shivaya : "ॐ नमः शिवाय" नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

तसेच श्री परमेश्वर मंदिर सभागृहात संगीतमय भागवत कथेला दि.२७ जुलै रविवारपासून सुरुवात होणार असून, हभप. भागवताचार्य विदर्भ केशव परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज मधुर वाणीतून उपस्थित श्रोते भाविकांना भगवान श्रीकृष्ण लीलांचे वर्णन व प्रत्यक्ष झाकीच्या स्वरूपात दर्शन घडविणार आहेत. भागवत कथा सोहळा संपताच दि.०३ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाच्या पंगतीने समारोप केला जाणार आहे. संगीतमय संत चरित्र कथा दि.०५ ऑगस्ट ते दि.१२ ऑगस्ट पर्यंत चालणार असून, कथेचं व्यासपीठ हभप प्रसिद्ध कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर या सांभाळणार आहेत. त्यानंतर दि. १४ ऑगस्ट ते दि.२१ ऑगस्ट पर्यंत संगीतमय शिवमहापुराण कथा होणार असून, कथेचे प्रवक्ता श्री परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या मधुर वाणीतून भगवान महादेवाचे दिव्य दर्शन उपस्थित भाविकांना झाकीच्या माध्यमातून घडणार आहे.

1008850880 Om Namah Shivaya : "ॐ नमः शिवाय" नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

शुक्रवार पासून श्रावण मासाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली असून, परमेश्वर व शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट, कळसावर विद्युत रोषणाई, सुरू असलेल्या ओम नमः शिवाय नाम जप, विशेष पूजा आणि अभिषेक यामुळे मंदिरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भाविकांसाठी खास राहणार असून, शिवभक्तांनी परमेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हावं. श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी ०२ ते ०५ वाजेपर्यंत चालणाऱ्या तीनही कथा सत्संग सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी लाभ घ्यावा. आणि शिवपती मंदिरात सुरु असलेल्या “ओम नमः शिवाय” नामजाप यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व सर्व संचालक मंडळीं, गावकरी नागरिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!