नांदेड । प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम, जागतिक पर्यावरण दिन जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.


जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड रेल्वे विभागात “प्लास्टिक प्रदूषण संपवा” या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिम उत्साहात राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत आज दिनांक 24 मे, 2025 रोजी प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम करण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला.

या मोहिमेअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आणि त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवली. या कार्यक्रमास श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांचे मुख्य मार्गदर्शन लाभत आहे.

ही मोहीम नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते. या मोहिमे अंतर्गत दिनांक 22 मे ते 05 जून दरम्यान नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. चला, स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी एकत्र येऊया!
