नांदेड| मीमांसा फाऊंडेशन, दै. समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अत्यंत महत्वाचा असलेला वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ हा पुरस्कार दै. लोकपत्रचे उपसंपादक प्रशांत गवळे यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून देण्यात आला.
नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह दि. 5 जानेवारी रोजी दर्पण दिनाच्या पुर्वसंध्येला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार दै. लोकपत्रचे उपसंपादक प्रशांत गवळे विधान परिषदेचे सभागृहनेते तथा आमदार हेमंत पाटील, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, आ. बाबुराव पाटील कोहळीकर, हिंदुस्थान टाईमचे सुरेंद्र गंगण, मॅक्स महाराष्ट्राचे मनोज भोयर, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, दै. समीक्षाचे संपादक तथा आयोजक रूपेश पाडमुख यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कार सन्मानीत करण्यात आला.