Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा समावेश निश्चित..NNL

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा समावेश निश्चित..NNL

Blog
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए चे केंद्रात सरकार स्थापन होत असून उद्या रविवार दि.9 जून रोजी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक साधणार आहेत. एन डी ए सरकार चे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची उद्या शपथ घेणार असून त्यांच्या समवेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) चे घटक दलाच्या ही निवडक नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. एन डी ए चे घटक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांचा सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला असून उद्या दि .9 जून रोजी ना.रामदास आठवले केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेऊन केंद्रीयमंत्री म्हणून हॅटट्रिक करणार आहेत.त्यामुळे देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रिप...
नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नांदेड, लातूर, लेख
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्‍या माध्‍यमातून लातूर जिल्‍हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्‍या कामामध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्‍यामुळे कामकाजाला गती मिळते. लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्‍हाधिकारी म्‍हणून लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्‍या. त्‍यांनी आपल्‍या कामाच्‍या माध्‍यम...
हिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL

हिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या बोरि/घारापूर शिवारात दि.०६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पाडसावर प्रथमोपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शेतकऱ्याची समयसूचकतेमुळे चिमुकल्या हरणाच्या पाडसाला जीवदान मिळाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.०६ शनिवारी सकाळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम वनपरिक्षेत्राच्या बोरि/घारापूर परिसरात सकाळच्या प्रहरी हरणांचे कळप फिरत होते. दरम्यान कळप पुढे गेल्याने चिमुकलं हरणाचा पाडस पाठीमागे राहिले. त्या पाडसाचा परिसरातील कुत्र्यांनी पाठलाग सुरु केला जीवाच्या आकांताने पाडस सैरावैरा पळत सुटले. मात्र कुत्र्यांनी पाडसावर हल्ला करून जखमी केले. हा प्रकार युवा शेतकरी संतोष देवराय माने यांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाचा पाडसाची सुटका केली. ...
नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयात गांजा विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून आज विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात छापा टाकला असता 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या घटनेमुळे गांजा तस्करात खळबळ उडाली आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 08/06/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री एम.डब्लु. दिगल...
पत्रकार दिलीप शिंदे यांच्या’झळा पावसाळा’ आत्मकथनाचे आज प्रकाशन

पत्रकार दिलीप शिंदे यांच्या’झळा पावसाळा’ आत्मकथनाचे आज प्रकाशन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। पत्रकार दिलीप शिंदे यांच्या 'झळा पावसाळा' या आत्मकथनाचे आज सायंकाळी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावेळी निवृत्त विभाग प्रमुख प्रा. सुरेश पुरी, प्रा गणी पटेल , ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. पिपल्स महाविद्यालयाच्या स्व.नरहर कुरुंदकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे. अविरत प्रकाशनचे प्रकाशक डॉ. देवदत्त देशपांडे यांनी ही माहिती दिली. मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकार दिलीप शिंदे प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. दै. नांदेड सांज, आकाशवाणी तसेच आधुनिक यूट्यूब माध्यमातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन माध्यमात आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. झळा पावसाळा या आत्मकथनातून त्यांनी पंचवीस वर्षातील गोड कटू अनुभव मांडले आहेत. बोली भाषेतुन कथानकाच्या स्वरूपातील लेखन हे ...
गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। गावठी पिस्टल बाळगुन तीची विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वजीराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गावठी पिस्टल, 05 जिवंत काडतुस असा एकुण 1,22,500/- रुपयाचा ऐवजसह अटक केली आहे, पोलिसांच्या धडाकेबाज कार्यवाही बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. नांदेड जिल्हयामध्ये गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचे दृष्टीने ) श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड शहर, ) सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग ईतवारा नांदेड यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देऊन त्यांना नियमीतपणे चेक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने आज दिनांक 07.06.2024 रोजी परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे व...
खुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

खुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

नांदेड
नांदेड| येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दसदिवशीय महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ झाला असून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो, श्रीलंकेच्या भिक्खूनी आर्याजी उपलवन्ना तसेच आर्याजी प्रजापती यांनी एकूण २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा दिली. यात दहा महिलांचा समावेश आहे. सदरील शिबिर १९ जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. यावेळी भिक्खू संघासह उपप्राचार्य साहेबराव इंगोले, इंजि. भरतकुमार कानिंदे, विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, माया पाईकराव, प्रा. यशवंत पाईकराव, डॉ. प्रतिक्षा कोल्हे, दिनेश कोल्हे, सिद्धांत इंगोले, अपेक्षा इंगोले, प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा...
अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना  अंतर्गत अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर या 6 जून ते 20 जून 2024 या पंधरवड्यात विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून या योजनेअंतर्गत लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान  व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. ...
श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्‍यांकडून बार मालकांची पाठराखण करणाऱ्या  अधिकार्‍यांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी -NNL

श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्‍यांकडून बार मालकांची पाठराखण करणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी -NNL

Blog
मुंबई| मागील अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर श्रद्धास्थानांचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दारू दुकाने, बियर बार यांना देण्यात आलेली देवीदेवता, राष्ट्रपुरुष, संत, गड-किल्ले यांची नावे बदलण्यात यावी म्हणून ४ जून २०१९ या दिवशी शासन आदेश काढला; मात्र ५ वर्षे झाली, तरी मुंबईतील ३१८ मद्यालये आणि बार यांपैकी २०८ म्हणजे ६५ टक्के दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुष यांची नावे असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी चक्क सदर आदेशच मागे घेण्यासाठी शिफारस केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाविक, राष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याऐवजी बार मालकांची वकीली करणार्‍या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांवर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करावी, तसेच ठराविक मुदतीत दारू द...
अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/मुखेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून दोन गटात तू तू-मै मै होऊन वाळूमाफियांनी तलवारी व खंजरने जोरदार हल्ला केला. यात मुखेड येथील तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन पोलीस उपअधीक्षक अबिनाशकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात कुठलाही नोंद झाली नसली तरी उशिरा याबाबत गुन्हा दाखल होईल असे सांगितले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन तीन युवकांनी सकाळी शुक्रवारी थांबून ठेवले होते. यावरून वाळूमाफियांमध्ये वाद झाला. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी तलवारी, रॉड व खंजरने मारहाण केली. यामध्ये दोघांचे बोटे तुटली असू...
error: Content is protected !!