Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा तरोड्यात महाविकास आघाडीकडून जल्लोष -NNL

नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा तरोड्यात महाविकास आघाडीकडून जल्लोष -NNL

नांदेड
नांदेड। नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयाचा नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक २ तरोडा (बु.) मध्ये काॅग्रेसचे युवानेते महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतीषबाजीसह एकमेकांना पेढे भरवून महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा विजय झाल्याने त्यासाठी मोठे मताधिक्य देऊन महत्वपूर्ण योगदान असलेल्या तरोड्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मूळ गांव तरोडा (बु.),चैतन्यनगर व अनेक उपनगरांमध्ये आनंदोत्सव साजरा केल्या. यावेळी काॅग्रेसचे युवानेते माणिक देशमुख, राष्ट...
किनवट व माहूर तालुक्यात झालेली मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे निकृष्ट दर्जाची – सुरेश शेंडे यांचा आरोप -NNL

किनवट व माहूर तालुक्यात झालेली मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे निकृष्ट दर्जाची – सुरेश शेंडे यांचा आरोप -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागीय, किनवट या कार्यालयाचा कारभार चालतो नांदेडहून किनवट व माहूर तालुक्यासाठी हे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे किनवट व माहूर तालुक्यात मागच्या आर्थिक वर्षात करण्यात आली आहेत. झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंड यांनी केले आहे. या कार्यालयात मंजुर पदांची संख्या १७ आहे. परंतु, कार्यरत अधिकारी व कर्मचारी चारच आहेत. यातील दोन अभियंते हे साईटच्या नावाने कार्यालयात न येता नांदेडहूनच काम करतात. या कार्यालयामार्फत करण्यात आलेली कामे ही लोकप्रतिनिधींशी व अधिका-यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून कंत्राटदारांनी ही कामे केली आहेत. टक्के वारीच्या नादात ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. लोकप्रतिनिधिंचा वरदहस्त अधिका-यांना असल्याने या कामाविषयी...
महा ग्रामीण अन्नदाता सहयोग योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा – शेख बँक व्यवस्थापक -NNL

महा ग्रामीण अन्नदाता सहयोग योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा – शेख बँक व्यवस्थापक -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। ग्रहकर्ज, सोनेतारन, पीक कर्ज,किसान क्रिडेट कार्ड, महिला बचतगट, पुरूष बचत गट, व्यापारी, उधोजक, शेळी पालन, व्यक्तीगत कर्ज, महाराष्ट्र ग्रामीण बॅक ही संपूर्ण सरकारी मालकीची महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बॅक आहे. शेतकरी याना त्यांच्या शेतावर हेक्टर प्रेमाने बिन व्याजी कर्ज देते खातेदार यांनी ३०जुन पर्यत आपले कर्ज खाते रेगुलर करून घ्यावे जेणेकरून आपणास केद्रशासन, व राज्य शासन यांच्या कडून व्याज परतावा मिळत असतो शेतकरी, खातेदार, व्यापारी, बचत गट यांनी महाग्रामीन नवचेतना संवाद यात्रा इस्लापुर येथे १३जुन रोजी विश्वास टीम येत असुन या संवाद यात्रेच्या माध्यमातून जन सपर्क करून माहिती सांगितली जाणार आहे. या संपर्क यात्रेत संचालक, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती सह महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत ज्या ज्या शेतकरी याना तिन लाख रूपये कर्ज असेल शेतकरी बांधव...
किनवटच्या महसूल प्रशासनाची धडक कार्यवाही…दोन दिवसात गौणखनिजाचे 6 ट्रॅक्टर व 1 टिप्पर पकडले -NNL

किनवटच्या महसूल प्रशासनाची धडक कार्यवाही…दोन दिवसात गौणखनिजाचे 6 ट्रॅक्टर व 1 टिप्पर पकडले -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवटच्या महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमे अंतर्गत फिरत्या पथकाने 4 व 5 जून अशा दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे 6 ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्याची कार्यवाही केली आहे. किनवट तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागाच्या फिरत्या पथकाने 4 जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टिप्पर पकडले आहेत.तालुक्यातील राजगड येथे दगड भरून वाहतूक करत असलेले 1टिप्पर व 2 ट्रॅक्टर फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले.त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्यामुळे दगड भरून असलेली तीनही वाहने ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालयाच्या आवारात लावली आहेत. जप्त केलेले दगड राजगड...
किनवटमध्ये महसुलची धडाकेबाज कारवाई; अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स तहसिल कार्यालयात लावले -NNL

किनवटमध्ये महसुलची धडाकेबाज कारवाई; अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स तहसिल कार्यालयात लावले -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांडा शिवारातून अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. परंतू उत्खनन करुन ट्रॅक्टर भरुन देणार्‍या जेसीबीवर मात्र पथक मेहरबान झाल्यामुळे प्रत्यक्ष दर्शीतांमध्ये उलटसुलट चर्चाला उधान आल्याचे दिसते. मोहपूर येथे एक आणि पाटोदा येथेही रेतीचे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. पैनगंगेतील रेतीचा मोहपूर येथे मोठ्या प्रमाणात चोरीचा व्यवसाय चालतो. एखादे ट्रॅक्टर धरुन चालणार नाही. तर खरबी अभयारण्य प्रशासनाशी संपर्क साधून कायमचा रेती उपसा थांबवायला हवा. अशी नेहमीचीच मागणी आहे. सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली व तहसिलदार शारदा चौंडेकरांच्याच कार्यकाळात रेती, दगड, मुरुमाचा अवैध व्यवसाय थांबऊ शकतात असे सद्याच्या धडक मोहिमेवरुन दिसते. बेंदीतांड्यातील अवैध मुरुम वाहतूक करीत करतांना महसुलच्या भरारी पथकातील...
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर अंकुश लावण्यात हिमायतनगर महसूल विभाग अपयशी -NNL

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर अंकुश लावण्यात हिमायतनगर महसूल विभाग अपयशी -NNL

नांदेड
हिमायतनगर/वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। कुणीही या ! ट्रॅक्टर घ्या! हायवा घ्या...आणि सरळ अवैध रेती उपसा ,आपलं व आमचं भांडवल वाढवा, असे म्हटले तरी हिमायतनगर तालुक्यात वावगे ठरणार नाही कारण येथील महसूल प्रशासनच दिवस-रात्र रेतीची तस्करी करणाऱ्या तस्करांना रान मोकळे करून देत असल्याचे सुजान नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या तारेवरची बाहुली बनलेले हे महसूल प्रशासक असल्याचे चित्र दिसून येत आहे नाममात्र एक दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही करून त्या कार्यवाहीचा डांगोरा जिल्हा भर वाजवीत आहेत हे मात्र कटू सत्य आहे. महसूल विभागाच्या मिली भगतीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्यास होऊन शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे असे सुजाण नागरिकांतुन बोलल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे वेळीच लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार थांबवावा असेही बोलल्या जात आहे...
मराठवाडा शेवटी कोणाचा…?

मराठवाडा शेवटी कोणाचा…?

नांदेड, लेख
मराठवाड्याने लोकसभेच्या निवडणुकीतून भाजपला धक्काच दिला आहे. 'भाजपचा गड' अशी आगेकूच करणाऱ्या मराठवाड्याने भाजपचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. ही परिस्थिती मराठवाड्यावर का आली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून तिघे काँग्रेसचे तर अन्य तिघे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व एक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व बीडचे खासदार शरद पवार यांच्या गटाचे निवडून आले. मराठवाड्यातील मतदार नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही. मराठवाड्यात त्यांच्या झालेल्या सभांना चांगल्याच प्रतिसाद होता . त्याचबरोबर अमित शाह यांनी घेतलेल्या प्रचार सभा ही चर्चेत राहिल्या. कलम ३७०, राम मंदिर , ट्रिपल तलाक या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना मराठवाड्यातील जनतेचाही पाठिंबा होता. मग असे काय घडले ज्यामुळे मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही? यावर चर्चा केली तेवढी क...
नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

क्राईम, नांदेड
नायगाव/नांदेड। जिल्ह्यातील नायगाव येथे एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार करणा-या नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी दुकानदारास अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी परिसरात गुरुवार दिनांक 06 रोजी एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेबुब उर्फ सोहेल मुस्तपा शेख या नराधमाला शनिवारी दिनांक 8 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. नायगावातील मरवाळी येथील महेबुब शेख याच्या दुकानात निरमा पुडा घेण्यासाठी पाच वर्षीय चिमुरडी आली होती. यावेळी तिला चॉकलेट देतो, म्हणून या नराधमाने दुकानाच्या आत बोलवले. आणि तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने या घटनेबद्दल नातेवाईकांना सांगितले. पीडी5चिमिकलीचे वडील बाहेरगावी असल्याने कु...
माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL

माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यात कपाशी बियाण्याची व कीटकनाशकाची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी दुकानावर कारवाया करावी अन्यथा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १० वा. किनवट माहूर रोडवरील वाई बा.फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका गोरसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकरी बि बियाणे खरेदी करता बाजारात गर्दी करीत आहेत. काही बियाणे वाणास व औषधीस शेतकरी जास्त पसंती देत असल्याने ज्या कपाशी बियाण्याच्या वाणास कीटक नाशकास शेतकऱ्यांची जास्त पसंती त्या वाणाचा कृषी साहित्य विक्रेते जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असून प्रती पॉकेटवर १००० ते १५०० रुपया पर्यत जास्त मोबदला दिल्यास उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांना म...
हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत !  NNL

हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत ! NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| लोकसभा निवडणूकी नंतर आता विधान सभा निवडणुकीची चर्चा होत असून, लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बाबुराव कदम कोहळीकर हे विधान सभेच्या निवडणूकीत उतरणार हे आता जवळपास फिक्स असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व कोहळीकर यांच्यातच सत्ता संघर्ष झालेला पहावयास मिळणार असून, ऑक्टोबर मध्ये विधान सभेच्या निवडणूका होणार असल्याने आतापासूनच या निवडणूकीची जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका काँग्रेस राष्ट्र वादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी व तसेच भाजप शिवसेना शिंदे गट, राष्ट्र वादी अजित पवार गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून एकत्र लढल्या गेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीला सुगीचे दिवस पहावयास मिळाले असून, महायुतीला उतरती कळा लागली असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळाले. लोकसभे प्रमाणे विधान ...
error: Content is protected !!