Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
उमरखेडच्या नेहाची नीटमध्ये गगनभरारी 720 पैकी 720 घेऊन देशातुन प्रथम रँकवर -NNL

उमरखेडच्या नेहाची नीटमध्ये गगनभरारी 720 पैकी 720 घेऊन देशातुन प्रथम रँकवर -NNL

उमरखेड
उमरखेड,अरविंद ओझलवार। नुकताच नीटचा रिझल्ट लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कुमारी नेहा कुलदीप माने ही 720 पैकी 7 20 गुण घेऊन आल्याचा मान तिने मिळवला आहे. उमरखेड तालुक्यातील बोरी चातारी येथील शिक्षक असलेले कुलदीप माने यांची कु . नेहा ही मुलगी असून उमरखेड जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभागाचे एस डी ओ रामराव शावजी माने पाटील . यांची नात असून कु . नेहा कुलदिप माने हिने देश पातळी वरील वैद्यकिय प्रवेशासंबंधीची परिक्षा निट परिक्षेत 720 पैकी 720 गूण मिळवून उमरखेड तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक मोठे उत्तूंग यश मिळवले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची अभ्यासू नेहा लहाणपणा पासून गुणवत्तेत आघाडी वर आहे . माने परिवाराची लेक... धानोरा येथील डॉ. प्र.भा.काळे सरांची नात ...आज उत्तूंग यशाची मानकरी झाली आहे . कु . नेहा ची एम्स मध्ये प्रवेश घेण्याची ईच्छ...
आष्टा फाटा येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी -NNL

आष्टा फाटा येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता उघडकिस आली आहे. 'त्या' जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी केली असून पोलीस प्रशासनाकडून जनतेला मयत महिलेबद्दल माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे... याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात दाखल आ .मृ. क्र. १०/२०२४ कलम १७४ सी. आर.पी. सी. अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात एक अनोळखी स्त्री जातीचे महीला वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे जिची उंची ५ फुट रंग सांगता येत नाही.. केस जळालेले.. नाक आखुड छोटे...शरीर बांधा सडपातळ, अंगावरील कपडे :- अर्धवट जळालेल्या अवस्थेत लाल रंगाचे परकरचा तुकडा, अर्धवट जळालेला ...
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। उद्या दि. 8 जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर सुरू करणार आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधून हजारोच्या संख्येने समाजबांधव अंतरवाली कडे कुच करणार असल्याची माहिती मराठा सेवक श्याम वडजे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी नऊ महिन्यापासून अंतरवाली सराटी या गावात चालु असणारं आंदोलन अनेक वेळा सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सरकारला काय यश मिळाले नाही. शेवटी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा जोरदार फटका बसला असुन, 45 प्लस जागेवर आपला दावा करनारे सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले. हे सामाजिक आंदोलनाचे राजकीय यश असेच म्हणावे लागेल. कारण या सामाजिक आंदोलनातून मराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या सरकारला कुठेतरी जागा दाखवण्याची गरज समाज व्यक्त करीत होता आणि त...
अतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

अतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। सीटू आणि जमसंने लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी यास हलक्यात घेत आहेत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपयाची मागणी जिल्हाधिकारी आणि शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ठराव शासनास दिला आहे. आणि पेस...
माझ्या मुलाचा घातपात झाला; पाण्यात बुडून मृत्यू झाला नाही – NNL

माझ्या मुलाचा घातपात झाला; पाण्यात बुडून मृत्यू झाला नाही – NNL

नांदेड
नांदेड/अर्धापुर। शेणी ता.अर्धापूर येथील सालदार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सौ. सुनीता आणि संजय हातागळे यांच्या १८ वर्षे वय असलेल्या आणि इयत्ता १२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ऋतुराजचा २० एप्रिल रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज यास घेऊन गेलेला व मृत्यूची खबर देणारा किंवा त्याचे रक्ताचे नातेवाईक मुलाच्या अंत्यविधीस आले नाहीत किंबहुना त्यांच्या वागणुकीवरून संशय बळावत चालला आहे. अर्धापूर पोलिसांची कामगिरी आणि निमगाव आरोग्य उप केंद्रातील शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची कामगिरीही संशय निर्माण करणारी आहे. नातेवाईकांच्या मुलाने आमचा मुलगा ऋतुराज यास बोलावून नेले आणि काहीवेळाने फोन करून कळविले की, तुमचा मुलगा चोरंबा कॅनल मध्ये पाण्यात बुडाला आहे. एक रात्र मुलगा पाण्यात होता दुसऱ्या दिवशी मुलाचे प्रेत शोधण्यास यश आले. मुलाच्या पोटात बिल्कुल पाणी गे...
ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने नांदेड भाजपतर्फे मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार – NNL

ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने नांदेड भाजपतर्फे मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| भाजप महानगर नांदेड तर्फे अमेरिकेतमध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार असून, सर्व क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेणाऱ्या हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे रविवार दि.९ जुन रोजी रात्री ७ वाजल्यापासून शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १६ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचकारी सामना होणार आहे. खा. अशोकराव चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. क...
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

नांदेड, लेख, हिंगोली
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डंका सर्वात जोरात वाजत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तर ठाकरे यांच्या शिवसेनेने गद्दार, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ठाकरे यांच्या शिवसेनेलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. भाजपाचा पराभव झाला याच आनंदात असलेल्या ठाकरे गटाला या वास्तवाचे भान आहे की नाही माहिती नाही. लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वाचे लक्ष लागले होते ते शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामान्य नागरिक कोणाच्या बाजुने उभे राहतील याची उत्सुकता सर्वानाच होती. तथापि लोकसभा निवडणुकीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे या निवडणुकीत नुकसान जास्त झाले. तसेच जो विजय मिळाला ...
भाई धोंडगे पाठोपाठ चिखलीकरानाही सलग दुसऱ्यांदा लोकसभेत ‘जाण्यास अपयश, ३४ वर्षानंतर योग” हुकला

भाई धोंडगे पाठोपाठ चिखलीकरानाही सलग दुसऱ्यांदा लोकसभेत ‘जाण्यास अपयश, ३४ वर्षानंतर योग” हुकला

नांदेड
लोहा| राजकारणात जय- पराजय' होतच असतो, ते विसरून नेता पुन्हा जनतेच्या दरबारात जात असतात. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच लोहा - -कधार' अग्रस्थानी राहिले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भोवतीच गेली तीन दशक जिल्ह्याचे राजकारण फिरते आहे. पण तीन महिण्यापूर्वी अशोकराव' भाजपात आले आणि या दोन्ही नेतृत्वान समेट' झाला. पण तो' जनतेला '' आवडला नाही हेच निकालातून स्पष्ट दिसले. १९७७ नंतर भाई धोंडगे सलग दुसन्यांदा लोकसभेत जाऊ शकले नाहीत. ३४ वर्षानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली असून, मन्याड खोऱ्यातील नेतृत्व प्रतापरावांनाही दुस-यांदा' लोकसभेत जाण्यास अपयश आले आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात २००९ पूर्वी" कंधार (आताचा लोहा) विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात शेकापक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेड लोकसभा, निव...
लातूर मध्ये भाजपाची हॅट्ट्रिक हुकली;पुन्हा काँग्रेसला संधी, ‘ वंचित ‘ फॅक्टर फेल..

लातूर मध्ये भाजपाची हॅट्ट्रिक हुकली;पुन्हा काँग्रेसला संधी, ‘ वंचित ‘ फॅक्टर फेल..

नांदेड, लातूर
नांदेड,विशेष प्रतिनिधी| लातूर लोकसभा मतदार संघान भाजपा उमेद्‌वार सुधाकर श्रृंगारे यांचा काँग्रेस उमेदवार डॉ शिवाजी कळगे यांनी ६१ हजार ८८१ मतांनी पराभव केला. लातूर ग्रामिण व शहर तसेच निलंगा तीन मतदार संघात मोठी पिछेहाट झाली. उदगीर, अहमदपूर मतदार संघान थोडी आघाडी तर लोहा मतदार संघ जवळपास बरोबरी राहिली. मागील निवडणूकीत काँग्रेस उमेदवार २ लक्ष ८९ हजार मतांनी पराभूत झाला होता. पण यंदा ती लीड भरून काढत काँग्रेसने भाजपची हॅट्ट्रिक हुकविली.. भाजपा विरोधी वातावरण, स्वतः ची कोणतीच प्रभावी व सक्षम यंत्रणा नसणे व पूर्णत: पक्ष संघटनेवर अवलंबून राहणे ,संपर्क नसणे, विश्वासू कार्यकर्ते तयार न करणे याचा मोठा फटका सुधाकर शृंगारे यांना बसला. भाजपाचीसोशल मीडिया ऐनवेळी फेल झाली. " थ्री-एम" (मराठा-मुस्लिम- मागासवर्गीय) 'च्या नाराजीचा फटका पक्षाला बसला त्याचा रोष मतपेटीतून दिसला. लातूर मतदार संघात काँग्रेस पक...
गेल्या निवडणूकीत ३ लक्ष ७२ हजार मते; यंदा मात्रा …केवळ २ हजार …! नोटा पेक्षा कमी….!

गेल्या निवडणूकीत ३ लक्ष ७२ हजार मते; यंदा मात्रा …केवळ २ हजार …! नोटा पेक्षा कमी….!

नांदेड, लातूर
लोहा| राजकारणात कधी कोणाचे नशीब फळाला येईल सांगता येत नाही. नशीब अपना अपना' असंच काहीच निवडणूकीत असते.... गेल्या निवडणुकीत ३ लक्ष ७२ हजार मतदान पडलेल्या उमेदवाराला या निवडनुकीत 'नोटा' पेक्षाही कमी मतदान पडले ... !..अहो....! आपला विश्वास बसणार नाही.. छे;..! अस ..कस ..होईल बर..! हे तर शक्यच नाही असं छाती ठोकपणे आपण सांगणार- हो...! पण हे खरं आहे...! त्याचे असे की, लातूर या एससी राखीव मतदार संघात दोन निवडकुरा हरल्यानंतर कांग्रेस पक्षाने या निवडनुकीत डॉ. शिवाजी काळगे या बालरोग तज्ज्ञ डॉक्टराच्या रुपाने विजय संपादन केला आहे. बदलते वारे ..... आरक्षण... संविधान बदलणार ..यासह विरोधातले वारे' जोरात वाहिले .. अन' अबकी बार.....भाजपा गार ..! असेच झाले. मागील निवडणुकीत २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाने मच्छिंद्र गुणवंत कामंत यांना ' लातूर मधून उमेद्‌वारी दिली. त्यांना ३ लक्ष ७२ ह‌जार ३८४ मते मिळाली. त्य...
error: Content is protected !!