Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

सुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

नांदेड
नवीन नांदेड। केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ या पदावर सुमेधराज गंगाधर (कांबळे)हिंदोळकर यांची निवड झाली असून मित्र मंडळ व परिवारातील सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. नांदेड मर्चटस बॅक शाखा सिडको चे शाखाधिकारी श्री गंगाधर यादवराव कांबळे यांचे जेष्ठ पुत्र सुमेधराज यांनी शालेय प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात अग्रेसर राहुन पुर्वी पासूनच शिक्षणातील असलेली आवड व विविध स्पर्धा परिक्षा मध्ये मिळालेल्या यशामुळे ,गुणवतेमुळे श्री.गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे बि.टेक चे शिक्षण पूर्ण झाले तर गेट परिक्षेत भारतातून ७५ वा ऑल इंडिया रँक आला होता, त्यानंतर आय आय टी दिल्ली येथे एम.टेक चे शिक्षण पुर्ण झाले. सध्या श्री गुरु गोविंदसिंगजी अभियंत्रीकी महाविद्यालय नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी प्रि,मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२४ म...
हदगाव तालुक्यातील ओबीसीचे शिष्टमंडळ वडगोद्री येथे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भेटीला -NNL

हदगाव तालुक्यातील ओबीसीचे शिष्टमंडळ वडगोद्री येथे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भेटीला -NNL

महाराष्ट्र, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। मौजे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अंतरवालीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांना भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राज्य सरकार जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण न देण्याबाबत लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे सोमवारी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून चारशेहून अधिक गाड्या वडीगोद्री येथे दाखल झाल्या होत्या यामध्ये शिरूर तालुक्यातून तब्बल दोनशेहून अधिक गाड्या आल्या होत्या याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून आंदोलनाला पाठिंब...
बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नामुळें पारधी समाजाच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर -NNL

बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नामुळें पारधी समाजाच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर -NNL

नांदेड
मुंबई/नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोळी गावच्या बद्री चिंतामणी चव्हाण या ३५ वर्षीय पारधी समाजाच्या तरुणाचा मधमाशांच्या दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १७ जून रोजी घडली. बद्री चव्हाण यांच्यावर त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेची जबाबदारी होती व त्यांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब निराधार झाले होते. सदर बाब शिवसेना नेते श्री बाबुराव कदम कोहळीकर यांना समजताच त्यांनी तातडीने मदतीसाठी त्यांची यंत्रणा कामास लावली. तसेच बाबराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडून पीडित कुटुंबास आर्थिक मदत मिळण्यासाठी, राज्याचे संवेदनशील व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष ही बाब ठेवताच, मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणास तातडीने विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वर्ग केली. लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यानंतर मु...
बिडिओंच्या नावावर ‘नरेगा ‘ योजनेत गोंधळ ! उमरखेड पंचायत समितीतील प्रकार ! -NNL

बिडिओंच्या नावावर ‘नरेगा ‘ योजनेत गोंधळ ! उमरखेड पंचायत समितीतील प्रकार ! -NNL

नांदेड, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या निगडीत असलेली नरेगा योजना उमरखेड तालुक्यात सर्वदूर राबविण्यात येत असून ही योजना मात्र अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी अर्थपूर्ण योजना ठरत आहे .पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क बिडीओ यांच्या नावावर नरेगातील कर्मचारी पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे . गुरांचा गोठा , सिंचन विहीर वैयक्तिक, मोहगुनी वृक्ष लागवड ,बिहार पॅटर्न वृक्षलागवड ,नाली बांधकाम, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड , स्मशानभूमी वृक्ष लागवड , पांदण रस्ते तयार करणे , शोषखड्डे ,गांडूळ खत निर्मिती , कुक्कुटपालन शेड , शेळी पालन शेड,रोपवाटिका ,फळबाग , मच्छी तलाव यासह विविध हेडवर पंचायत समिती मार्फत कामे सुरू असून येथील गट सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपिओ )तांत्रिक अधिकारी ( पीटिओ )डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी मात्र या योजनेमध्ये गोंधळ निर्माण करू...
कृषी कन्यांचे शेतकऱ्यांना बीयाणे उगवण क्षमत्ता संदर्भात मार्गदर्शन; माझा एक दिवस माझ्या बळीरा‌जासाठी उपक्रम -NNL

कृषी कन्यांचे शेतकऱ्यांना बीयाणे उगवण क्षमत्ता संदर्भात मार्गदर्शन; माझा एक दिवस माझ्या बळीरा‌जासाठी उपक्रम -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्या अंतर्गत कृषी महावि‌द्यालय उमरखेड येथील कृषी कन्यांनी बियाणे उगवण क्षमता संदर्भात उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावात शेतकत्यांना मार्गदर्शन केले. घरी साठवलेले किंवा बाजारातून विकत आणलेले बियाणे पेरणीसाठी वापरायचे असल्यास प्रथम बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. बियाण्यांची पुनर्पेरणी टाळण्यासाठी बीज उगवण प्रक्रिया करणे आवश्यक आहे, बियाण्यांच्या उगवण क्षमता तपासणी अंती उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढ्या प्रमाणात उगवण शक्ती कमी आहे. तेवढ्या प्रमाणात प्रती हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करिता वापरावे हे पटवून देण्यासाठी कृषी महा‌विद‌यालय उमरखेड येथील विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे ,भारती गाईगोले, राखी भोयर ,विधी चोपडे ,समृध्दी अलोडे, श्रीज्या येती यांनी गोणपाठ या सरळ व सोप्या पध्दतीने बियाणे उगवण ...
ज्वारी खरेदी केंद्राला मुदत वाढ द्या खा नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे देशमुख यांनी केली मागणी -NNL

ज्वारी खरेदी केंद्राला मुदत वाढ द्या खा नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे देशमुख यांनी केली मागणी -NNL

नांदेड, हिंगोली
किनवट परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदी केंद्राचा लाभ मिळावा व शेतकऱ्यांना शासन दर मिळावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या मागणीनंतर आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्वारी खरेदी केंद्राला किनवट तालुक्यातील इस्लापूर या ठिकाणी मंजुरी मिळाली. पण ज्वारी खरेदी ही संत गतीने चालू असल्या कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरील केंद्राची खरेदीची मुदत ही 30 जून रोजी संपणार असून या मुदतीस एक महिन्यासाठी वाढ मिळावी अशा स्वरूपाची मागणी इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नागेश पाटील यांच्याकडे केली. शेतकऱ्याची हित लक्षात घेऊन सदरील खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळवण्यासाठी शासन दरबारी वजन ...
आगामी विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवणार – प्रा.मनोहर धोंडे-NNL

आगामी विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवणार – प्रा.मनोहर धोंडे-NNL

नांदेड
कंधार, सचिन मोरे। गेल्या 38 वर्षापासून गोरगरीब, उपेक्षित,वंचित, शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेकार आदिवासी या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. शिवा संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करत मोठा लढा उभारला. गेल्या अनेक वर्षापासून लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे होणारे बेहाल थांबून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आगामी विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी व्यक्त केला आहे. सेवा जनशक्ती पार्टीच्या संपर्क कार्यालयात 18 जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. धोंडे पत्रकारांशी संवाद साधत पुढे बोलताना म्हणाले की" झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 48 जागांपैकी 30 जागा निवडून दिल्याबद्दल सर्व सामान्य जनता व मतदारांचे आभा...
पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी – आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांना मागणी -NNL

पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी – आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांना मागणी -NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार। पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत पशुपालन व्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पशुपालन व दुग्धव्यसाय हा कृषीपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करणे आवश्यक झाले आहे. हि बाब लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी महसूल, पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती व उद्योजकतेद्वारे पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ करणे हे पशुसंवर्धन विभागाने उद्दिष्ट धेऊन विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन विभाग पुनर्रचनामुळे अधिकाधिक पशुपालकाभिमुख केला असून त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यां...
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावात जागा हिस्स्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी – NNL

हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावात जागा हिस्स्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या मौजे वाळकेवाडी येथे जागेतील हिस्स्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी कडे व दगडाने मारून एकमेकांची डोके फोडून घेतल्याची घटना दि. १८ रोजी सकाळी घडली आहे. याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास बिट जमादार बालाजी पाटील हे करत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या पाहितीनुसार, दि.१८ रोज मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डावरे कुटुंबातील एका जागेच्या हिस्स्याच्या कारणावरून तू तू..मै मै.. झाली. याचे पर्यवसान भांडणात होऊन तुंबळ हाणामारी झाली, तसेच दोन्हीकडील सदस्यांनी एकमेकांचे डोके फोडून घेऊन गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये श्यामसंदर सुभाष डवरे वय २६ वर्ष व्यवसाय मजूरी रा. वाळकेवाडी ता. हिमायतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हं...
जागतिक योग दिन निमित्त यंदाची चालण्याची भव्य स्पर्धा रविवार दि.२३ जून रोजी होणार धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर – NNL

जागतिक योग दिन निमित्त यंदाची चालण्याची भव्य स्पर्धा रविवार दि.२३ जून रोजी होणार धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| सुदृढ भारत व्हावा या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने शुक्रवार २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार असून सलग २३ वर्षांपासून घेण्यात येणारी यंदाची चालण्याची भव्य स्पर्धा रविवार दि.२३ जून रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे .माध्यम प्रतिनिधीसह विविध १० गटात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक मोबाईल बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. शुक्रवार दि.२१ जुन रोजी जागतिक योग दिनानिमित्त सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट नांदेड येथे सकाळी सहा ते सात पर्यंत योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. २३ वी अमरनाथ यात्रा ५ जूलैला व २४ वी अमरनाथ यात्रा १८ जुलैला नांदेड येथून रवाना होणार आहे. अवघड...
error: Content is protected !!