Homeनांदेडहिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावात जागा हिस्स्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी - NNL

हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावात जागा हिस्स्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी – NNL

हिमायतनगर| तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या मौजे वाळकेवाडी येथे जागेतील हिस्स्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी कडे व दगडाने मारून एकमेकांची डोके फोडून घेतल्याची घटना दि. १८ रोजी सकाळी घडली आहे. याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास बिट जमादार बालाजी पाटील हे करत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या पाहितीनुसार, दि.१८ रोज मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डावरे कुटुंबातील एका जागेच्या हिस्स्याच्या कारणावरून तू तू..मै मै.. झाली. याचे पर्यवसान भांडणात होऊन तुंबळ हाणामारी झाली, तसेच दोन्हीकडील सदस्यांनी एकमेकांचे डोके फोडून घेऊन गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये श्यामसंदर सुभाष डवरे वय २६ वर्ष व्यवसाय मजूरी रा. वाळकेवाडी ता. हिमायतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, त्याचे चूलता शेषेराव डवरे हा गावातील सरपंच याच लोकाना घेवून फिर्यादीचे घरी येवून म्हणाला कि, शेकूतलाबाई यांचे कडून विकत घेतली जागेत मला पाण हिसा पाहीजे. असे म्हणून शेषेराव डवरे यांनी वाद घालून शिवीगाळ केली व तूकाराम डवरे यांने फिर्यादीची पत्नी साक्षिदार सूलोचना हिस हातातील लोखंडी कड्याने मारून डोके फोडले. आणि भाऊ डवरे याना पण तुकाराम डवरे यानी हातातील लोखंडी कड्याने मारून डोके फोडले व रामदास डवरे यांनी पण शिगीगाळ करून लाथा बूक्याने मारहाण करत जिवी मारण्याची धमकी दिली. यावरून हिमायतनगर पोलिसात आरोपीतांनी संगणमत करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे जबाब वरून 1) शेषेराव डवरे 2) तुकाराम डवरे 3) रामदास डवरे सर्व रा. वाळकेवाडी ता. हिमायतनगर यांच्याविरुद्ध गूरण १३७ /२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटातील शेषेराव तुकाराम डवरे वय ५६ वर्ष व्यवसाय मजूरी रा. वाळकेवाडी ता. हिमायतनगर यांनी तक्रार दिली कि, फिर्यादीचे घरा जवळ हा तीच्या बहीणीच्या रिकामी जागेत मला हिसा द्या असे म्हणून मागण्यासा गेला असता संगणमत करून लक्ष्मीबाई सुभाष डवरे हिने दगडाने मारून डोके फोडून त्यामुळे रक्त निघाले व इतर तिघांनी लाथा बून्यानी माराहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे जबाब वरून 1) लक्ष्मीबाई सुभाष डवरे 2) सुभाष तूकाराम डवरे 3) श्यामसुंदर सूभाष डवरे 4) कृष्णा सुभाष डवरे सर्व रा. वाळकेवाडी यांच्याविरुद्ध गूरण १३८ /२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटाचे लोकांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आपापल्या समर्थकांसह उपस्थित होऊन तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार बालाजी पाटील हे करत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments