Homeनांदेडविद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज - प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

नवीन नांदेड। देश विकासाकडे वाटचाल करतांना अनेक प्रगती केलेली आहे.परंतु हा विकास होत असतांना मात्र समाजातील काही संस्कार,मूल्य लोक पावत चाललेली आहेत त्याकरिता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी कार्य केल्यास संस्कार संस्कारक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र नवीन नांदेड अंतर्गत आयोजित समाजकार्य पंधरवाडा,इतरांचा आदर व महिलांचा सन्मान,शिव्या मुक्त समाज अभियान व्याख्यान मालेत ‘शालेय समाजकार्याची गरज दिवस शालेय समाज कार्यकर्त्याची भूमिका’ याविषयावर बोलताना व्यक्त केले.

सदरील कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र सोशल वर्क असोसिएशन ‘मास्वे’चे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर मुजावर तर मंचावर डॉ. निरंजन कौर सरदार, डॉ. मनीषा मांजरमकर व विभाग प्रमुख प्रा. डॉ. मेघराज कपूर यांची यावेळी उपस्थिती होती.

सदरील व्याख्यानमालेत कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करून विस्पर डाउन लेन, वर्ल्ड लेस स्टोरी, ब्लाइंड फॉल्डेड अब्स्टॉकल, बलून ब्रेकर, कॉमन अन कॉमन पेपर, रॅबिट टारटाईझ स्टोरी कौशल्य डॉ. शेख असिफ व डॉ. मेघराज कपूर यांनी घेतले या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, संवाद कौशल्य, स्मरणशक्ती वाढ, व्यक्ती सहाय्यकार्य व्यस्थापन, गट कार्य व्यस्थापन, कसे करता येईल याविषयी विध्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पाटील एन.जी. तर आभार डॉ.शेख ए. ए. यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास डॉ. रेड्डी व्ही.एस. डॉ. लोखंडे पी. पी.डॉ.कठोडे डी. के.डॉ, शिंदेएस. एस. डॉ.कर्डीले ए. एन., डॉ. वरगंटे एस. डी.प्रा. गोईनवाड एस.एस प्रा.बडगीरे जी. एच. राठोड एस.व्ही, मोरे एस. एस,पाळेकर आर. एम., श्री कंधारकर एस.एल.गणेश तेलंग व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी यांची मोठयासंख्येन यावेळी उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments