विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL
नवीन नांदेड। देश विकासाकडे वाटचाल करतांना अनेक प्रगती केलेली आहे.परंतु हा विकास होत असतांना मात्र समाजातील काही संस्कार,मूल्य लोक पावत चाललेली आहेत त्याकरिता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी कार्य केल्यास संस्कार संस्कारक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र नवीन नांदेड अंतर्गत आयोजित समाजकार्य पंधरवाडा,इतरांचा आदर व महिलांचा सन्मान,शिव्या मुक्त समाज अभियान व्याख्यान मालेत 'शालेय समाजकार्याची गरज दिवस शालेय समाज कार्यकर्त्याची भूमिका' याविषयावर बोलताना व्यक्त केले.
सदरील कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र सोशल वर्क असोसिएशन 'मास्वे'चे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले याव...
