Wednesday, July 1

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
हिमायतनगरच्या छत्रपति शिवाजी नगरात बंद घराचे कुलूप चोरटयांनी तोडले; ७३ हजारांचा सोनेचांदीचा ऐवज लंपास – NNL

हिमायतनगरच्या छत्रपति शिवाजी नगरात बंद घराचे कुलूप चोरटयांनी तोडले; ७३ हजारांचा सोनेचांदीचा ऐवज लंपास – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावर असलेल्या छत्रपति शिवाजी नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करत लोखंडी अलमारीतील जवळपास ७३ हजारांचा सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात मागील काही महिन्यापासून शेतातील आखाड्यावर चोरटयांनी हळदीसह, मुके जनावरे, शेतातील पाईपलाईन आदिसां अन्य साहित्य चोंरून नेऊन शेतकऱ्यांची झोपडवीली होती. त्या चोरीच्या घटनांचा तपस जैसेथे असताना आता चोरट्यानी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. शहरातील बालाजी उत्तम पुरी लाईनमन रा. छत्रपती शिवाजी नगर रेल्वे स्टेशन रोड हिमायतनगर हे आपल्या मुलाबाळांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटयांनी संधीचा फायदा घेत दि 16 ते 18 च्या दरम्यान घराच्या गेटचे व दरवाजाच्या कुलुप तोडून आता प्रवेश ...
भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले -NNL

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ऍड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांचा उहापोह केला. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे विद्यार्थी व तरुणांची परिक्षा पहात आहे. नीट मध्ये पेपरफुटी झाली असतानाही सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाह...
‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे -NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे -NNL

मनोरंजन, नांदेड
नांदेड| मनोरंजन क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारत चालले आहे. त्यानुसार नाटक, चित्रपट, लघुचित्रपट, मालिका, वेबसिरीज, जाहिरात आदी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित नट-कलावंतांची मागणीही वाढलेली आहे. भारतीय चित्रपट मोठ्या प्रमाणावर अंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशाचा डंका वाजवताना पहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विशेष करुन नांदेडच्या मातीतील कलावंतामध्ये प्रचंड उर्जा आणि कलागुण आहेत. गरज आहे ती शास्त्रशुध्द प्रशिक्षणाची आणि हिच गरज ओळखून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विषयाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणाऱ्या स्कूल ऑफ फाईन अॅन्ड परफॅार्मिंग आर्टसने (नाट्य व चित्रपट विभाग) आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या चित्रपट निर्मीतीचे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेशी सामंजस्य करार केला. भारत सरक...
मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांची प्रेरणादायी काम हे आपणासाठी ऊर्जा असून गाव पातळीवर बालिका पंचायतच्या माध्यमातून गावागावात महिला सशक्तीकरणाचे पाऊल पुढे पडत आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या युवतींचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. नांदेड जिल्‍हा परिषद राबवत असलेल्‍या बालीका पंचायत या नाविन्‍यपूर्ण उपक्रमात उत्‍कृष्‍ट कामगीरी केलेल्‍या बालीका पंचायत पुरस्‍कार सोहळा आज मंगळवार दिनांक 18 जून रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात संपन झाला, यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना त्‍या बोलत होत्‍या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्...
राजमाता जिजाऊ सृष्टी येणार्‍या पिढ्यांना मॉंसाहेब जिजाऊंच्या इतिहासाची साक्ष देईल – माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण -NNL

राजमाता जिजाऊ सृष्टी येणार्‍या पिढ्यांना मॉंसाहेब जिजाऊंच्या इतिहासाची साक्ष देईल – माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण -NNL

नांदेड
नांदेड। येथील जानकीनगर हनुमानगड भागात साकारत असलेली राजमाता जिजाऊ सृष्टी ही येणार्‍या कित्येक पिढ्यांना इतिहासाची साक्ष देत राहील, असा विश्‍वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतिदिनानिमित्त जिजाऊ सृष्टी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्षे आहे. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे निधन झाले. यावर्षी त्यांचा ३५० वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने नांदेड येथे अतिशय भव्य स्वरूपात राजमाता जिजाऊ यांचा इतिहास उलगडून दाखवणारी व जिजाऊंच्या इतिहासाला न्याय देणारी जिजाऊ सृष्टी जानकीनगर, हनुमान गड नांदेड येथे पूर्णत्वास येत आहे. राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, वैद्यकीय, सेव...
पेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा -NNL

पेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मायबाप शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कंपण्या आता थेट व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या लक्ष करीत असून कृषी अधिकाऱ्यांचे काम स्वतः आपले प्रतिनिधी नेमून छापेमारी करण्यास सुरवात केली आहे. मल्टिनेशनल कंपण्याची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक अपूर्ण मागण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटना व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर स्थानिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे. गोदरेज,एफएमसी,अदामा सारख्या कंपण्या आपल्या खाजगी प्रतिनिधी मार्फत कीटक नाशक दुकाने तपासणी करीत आहेत. खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवा मोंढा ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात...
उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कन्यांनी केले माती परीक्षणाबद्दल मार्गदर्शन -NNL

उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कन्यांनी केले माती परीक्षणाबद्दल मार्गदर्शन -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। पर्यावरणाचा समतोल व रासायनिक खताचा जास्त वापर यामुळे जमिनीची पोत बिघडत असून त्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे .शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषी कन्यानी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बेलखेड येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व व फायदे तसेच माती परीक्षण कोणत्या योग्य पद्धतीने करावे व माती परीक्षणाचा किती पट फायदा होईल याबद्दल पुरेपूर अशी सर्व माहिती दिली. मातीचे परीक्षण केल्यानंतर आपल्या शेतामधील मातीमध्ये कुठले पोषक द्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला मातीमध्ये कमी असलेले पोषक द्रव्य खताद्वारे उपलब्ध करून देऊ शकते याचा नक्कीच उत्पादन वाढीस फायदा होईल असे मार्गदर्शन कृषी कन्यांनी केले . मार्गदर्शनामुळे शेतकऱ्याचा मनात असल...
कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

स्पोर्ट्स
मुंबई| राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने तंतोतंत पालन करावे आणि त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कबड्डी खेळ रूजवावा - वाढवावा यासाठी प्रयत्न करावे. कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी शंकरराव साळवी सभागृहात अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सहकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यव...
खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीक विमा – कृषीमंत्री धनंजय मुंडे – NNL

खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीक विमा – कृषीमंत्री धनंजय मुंडे – NNL

Blog
मुंबई| प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन क...
मुल्यसाखळी विकास योजनाअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन – NNL

मुल्यसाखळी विकास योजनाअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर १२ जून २०२४ पासून या बाबींच्या टाईल्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटवर अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. कापूस सोयाबिन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी व कापूस, सोयाबिन व इतर तेलबिया पिकातील मुल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात...
error: Content is protected !!