Wednesday, July 1

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पैनगंगा नदी काठावरील कोठा तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी लावले कुलूप – NNL

पैनगंगा नदी काठावरील कोठा तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी लावले कुलूप – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर नवीन शैक्षणिक सत्र सुरु होऊन अद्याप एकही शिक्षक आला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप लावून शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला आहे. जोपर्यंत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा पवित्र शिक्षणप्रेमी पालकांनी घेतला आहे. हिमायतनगर तालुका हा मागास तालुका असून, आजही शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. शिक्षणाचा पाया असलेल्या कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरु होण्यापूर्वी महिन्यापासून शिक्षक देऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा अशी मागणी गावातील शिक्षणप्रेमी महिला पुरुष पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम रमेश आडे यांनी हिमायतनगर येथील गटशिक्षण कार्यालयाकडे केली. मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले आहे, नवीन शैक्षणि...
अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। शहरातील माहूर मार्गावरील अय्यप्पा स्वामी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वारासह मुख्य मंदिरातील तब्बल सहा कुलूपं तोडून चांदीचे मुकुट, देवांच्या छोट्या सुवर्ण प्रतिमा, कपाट व दानपेटीतील रोख रक्कम आदी मिळून सुमारे एक लाख 33 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फोडलेली दानपेटी शेजारच्या नाल्याजवळ फेकून देण्यात आली आहे. चोरीची ही घटना रविवार(दि.16)च्या रात्री 11.15 ते सोमवारी(दि.17) पहाटे 5.30 च्या दरम्यान घडली आहे. याच मंदिरातील ही चोरीची ही तिसरी घटना असून, श्वान पथक पाचारण करूनही काही हाती लागले नसल्याचे सूत्रांकडून कळाले. पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी राकेश पांडे आपल्या कुटुंबियांसह आणि वॉचमन मारुती मगर हे रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता पर्यंत जागे होते. त्यानंतर त्यांनी मंदिराची सर्व दारे बंद करून झोपी गेल्यावर सकाळी 5.30 वाज...
नांदेड पोलीसांची एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुस व एक खंजर जप्त करुन उल्लेखनिय कामगिरी -NNL

नांदेड पोलीसांची एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुस व एक खंजर जप्त करुन उल्लेखनिय कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने बकरी ईद संबंधाने सर्तक पेट्रोलिंग करुन रेकॉर्ड वरील आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवणे करीता, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केले होते. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन वरुन उप विभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे पोहेकों / राजेद्र सिटीकर यांनी दिनांक 17/06/2024 रोजी 13.45 वाजताच्या सुमारास वाजेगाव ग्रामपंचायत समोरील रोडवर वाजेगाव नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून आरोपी नामे शेख महेबुब ऊर्फ गोरु पि. बाबु वय 23 वर्षे व्यवसाय बेका...
महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यामध्ये शाब्दिक राडा; नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – NNL

महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यामध्ये शाब्दिक राडा; नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – NNL

नांदेड
नांदेड| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारण मीमांसा शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आगामी २० जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी झालेल्या भाजपच्या आभार बैठकीत महानराध्यक्ष आणि अन्य एका पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. काल नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याभरात आभार बैठक घेत आहेत. देगलूर, बिलोली, मुखेड नंतर सोमवारी सायंकाळी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची ताज पाटील हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली हो...
नांदेड येथील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी; १८ तासात केली अटक -NNL

नांदेड येथील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी; १८ तासात केली अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड शहरातील इस्लामपुरा हरुनबाग येहे मोकळया प्लॉटचे जागेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोण्यातरी कारणावरुन अब्दुल मन्सुर पिता अब्दुल रहीम वय ३७ वर्षे रा. हरुनबाग यांचे डोक्यात मागचे बाजुने, उजवे चाळयाचे वरील भागात कोणत्यातरी धारधार हत्याराने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. या घाणेला पोलिसांनी गांभीर्याने घेऊन तपास केला या खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी १८ तासात अटक केली असता सदर खुन हा अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाला आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १५.०६.२०२४ रोजी २३.०० वा. ते दिनांक १६.०६.२०२४ चे ०१.०० वा. चे दरम्यान हरुनबाग नांदेड येथे एजाज भाई यांचे घराचे तिनचार घराचे पुढे मोकळया प्लॉटचे जागेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन अब्दुल मन्सुर पिता अब्दुल रहीम वय ३७ वर्षे रा. हरुनबाग इस्लामपुरा नांदेड ...
पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्हा पोलीस भरती-२०२२-२३, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना देण्यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. पोलीस भरती निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणाने होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे असे आवाहन त्यानी केले आहे. नांदेड येथे पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.१९.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४ पर्यंत पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी ०५०० वाजता पासून राबविण्यात येणार आहे. भरती दरम्यान पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. भारती काळात काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली...
टेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL

टेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL

स्पोर्ट्स
मुंबई| टेनिस क्रिकेटअसोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव महेश मिश्रा यांची मुंबई विभाग प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुंबई जिल्ह्यातील सर्वत्र अभिनंदन होत आहे. या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम, महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मीडिया प्रमुख गणेश भलेराव,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नवीन नियम व वार्षिक...
राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? – नाना पटोले -NNL

राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? – नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण राज्य सरकार मात्र फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे यात मश्गूल आहे. सरकारला लोकांच्या जगण्या मरण्याचे काही घेणे देणे राहिले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, जून महिना संपत आला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. जनता भयंकर दुष्काळाचा सामना करत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही. ...
आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. 16 जून 2024 रविवार रोजी सकाळी ठिक 12.00 वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा- बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा 2026 कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकार्‍यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा म...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडीचा विकास साधणार – नवनिर्वाचीत खा. नागेश पाटील आष्टीकर -NNL

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडीचा विकास साधणार – नवनिर्वाचीत खा. नागेश पाटील आष्टीकर -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथम निवडून आल्या नंतर पहिल्यांदाच किनवट आदिवासीबहुल भागाचा दौरा करत असताना प्रथम त्यांनी लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडी येथे जाऊन प्रथम दर्शन घेतले तसेच येथिल परमपूज्य लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेऊन चर्चा केली असता त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकासा बरोबर या भागात शेतकऱ्यांसाठी सिंचन तलावाची निर्मिती करून हा भाग सुजलाम सुफलम करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावर नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर की या भागातील शेतकरी नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन या भागातच सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक येथे लावून काय समस्या आहे ते इथे सोडू असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. ज्यावेळेस मी प्रथम इथे दर्शनाला आलो तेव्हा माझ्या मनात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती मी अनेक वेळा उद्धव स...
error: Content is protected !!