Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे' गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. आणि आज नांदेड शहरात आम्हीं जरांगे या चित्रपटाची पुर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी नांदेड येथिल हॉटेल आकृती येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधण्यात आला सोबतच सकल मराठा समाज बांधवाना हितगुज साधत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यात आलं. यावेळी चित्रपटात 22 वर्षा चे जरांगे पाटील यांची भुमिका निभावणारे चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात तसेच चित्रपटाचे निर्माते डॉ दत्ता मोरे, कामाजी पवार,डॉ संजय कदम,पंजाब काळे पाटील,सौं कल्पना डोंगळीकर,नानाराव कल्याणकर,...
हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। शहरासह तालुक्यातील अनेक गावागावात अवैध रित्या देशी-विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अबाल, वृद्ध नागरिक दारूच्या आहारी जाऊन आपले आयुश्य बरबाद करून घेत आहेत. त्यामुळे जागरूक महिला मंडळी कडून हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अवैद्य दारू विक्री थांबवा आणि आमचे उघड्यावर येणारे संसार वाचवा, अन्यथा आम्हालाच धडक मोहीम उघडावी लागेल असा इशारा दिला होता. याची हिमायतनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारू विक्रेत्यावरील कार्यवाहीची धडक मोहीम उघडली आहे. आज दि.17 जून रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम, इंदिरानगर आबादि येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करून पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे महिलांनी अभिनंदन करून अशाच प्रकारचा दबदबा गावातील इतर दारू विक्रेत्यावर ...
समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत 35 जागा लढविणार! -ॲड रेवण भोसले -NNL

समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत 35 जागा लढविणार! -ॲड रेवण भोसले -NNL

Blog
धाराशिव| आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये किमान 35 जागा लढविण्यात येतील असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली. समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख यांचे संयुक्त बैठक मुंबई येथील बेलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 37 जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशांमधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश अखिलेश यादव ...
नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड मध्ये "वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन" मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा ज्येष्ठ नागरिक संघटणा फेष्काॅम मुंबईच्या उत्तर मराठवाडा विभागचे संस्थापक अध्यक्ष मा.सुभाषरावजी बार्‍हाळे तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेस्काॅम मुंबईच्या ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे सचिव मा.जयवंत सोमावाड,व कोषाध्यक्ष मा. नारायणराव वाढोणकर,तसेच मा.आनंदरावजी पाटील जवळगावकर, डाॅ.लक्ष्मिताई पुरनशेट्टीवार, श्रीमती प्रभाताई चौधरी,योग शिक्षिका श्रीमती शुश्माताई हुरणे व योग शिक्षिका शुश्माताई स...
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

महाराष्ट्र, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी मिळून दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण न्यायालयासाठी शहरात तात्पुरती इमारत मिळत नसल्याने बिल्डिंगची फरफट कायम आहे. अनेक वर्षांनंतर अतिरिक्त व सत्र न्यायालय मंजूर झाल्याने पक्षकार व वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे, पण लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी बिल्डिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून किनवट हा तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. येथे अतिरिक्त सत्र न्यायालय नसल्याने पक्षकाराची मोठी परवड व्हायची. सत्र न्यायालयाशी निगडित न्यायालयीन कामकाजासाठी गोरगरीबांना नांदेड येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. आणखी हे काही थांबलेले नाही. किनवट हा आदिवासी डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय नाही. ते इथे मंजू...
धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा..संत बाबा बलविंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती -NNL

धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा..संत बाबा बलविंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती -NNL

नांदेड
लोहा/नांदेड। लोहा येथून जवळच असलेल्या कारेगाव येथे सुसज्ज अशा लोहगड गुरुद्वारा मधे धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संत बाबा बलविंदरसिंघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. धन्ना भगत यांनी ६०८ वर्षांपूर्वी दिलेले विचार आजही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. भक्त शिरोमणी धन्ना यांनी श्रद्धेच्या जोरावर दगडात देव प्रकट केले होते. या महान भक्तांचा जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोहगड गुरुद्वारा मधे आयोजित केला होता. यानिमित भजन,कीर्तन,प्रवचन, कथा, अखंड पाठ आदि कार्यक्रम झाले. नांदेड व लोहा तालुक्यातील भक्त मंडळी मोठ्या श्रधेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे मित जथेदार भाई ज्योतिंदरसिंघ जी यांच्या अरादास कार्यक्रमाने सोहळ्याची उत्तम सांगता झाली. गुरुद्वारा मधे लंगर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. उपस्थित कथावाचक भाई सरबजितसिं...
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप सोहळा संपन्न -NNL

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप सोहळा संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांचे हित जपत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कर्ज दिले, देऊन शेतकऱ्यांकडून पीक कर्ज मुद्दतीच्या आत भरून घेऊन बिनव्याजी कर्जाचा फायदा करून दिला आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून फायदा मिळवून दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही काही ठीकाणी नंबर वन तर काही ठिकाणी दोन वर आहे अशीच वाटचाल हो त्यामुळे शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जात आहे असे प्रतिपादन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप व्यासपीठावरून बोलत होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा भव्य समारंभ सोहळा नक्षत्र हाॅल नांदेड येथे मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या प्रमुख उपस्...
नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी तरुण युवकाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या -NNL

नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी तरुण युवकाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या -NNL

नांदेड
नांदेड। जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील एक चळवळीतील तरुण तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे, शासन जागा भरत नाही, जाहिरात काढली तर भरती करून घेत नाही आणि केलीच भरती तर नियुक्ती पत्र देत नाही अशा अतिशय वस्तूतिथी आणि बोलक्या शब्दात चिट्टी लिहून अतिशय उद्विगन भावनेतून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मराठ्यांच्या लेकरांचे सर्वात जास्त मुडदे पाडणारं सरकार म्हणुन तुमची नोंद हो आहे, थोड्या तरी लाजा बाळगा..... एका कॅबिनेट मध्ये सुटणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा शेकडो बळी घेऊन सुद्धा तुम्ही सोडवत नाहीत याचा अर्थ मराठ्यांनी काय कारायच असा सवाल मराठा बांधव उपेक्षित करत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे बोलक्या शब्दात...
कौठा दरोडा प्रकरणी 48 तासात दरोडेखोरांना अटक करा, अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन -NNL

कौठा दरोडा प्रकरणी 48 तासात दरोडेखोरांना अटक करा, अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन -NNL

क्राईम, नांदेड
कंधार, सचिन मोरे। कंधार तालुक्यातील कौठा येथील कृषी व्यापारी गजानन येरावार यांच्या घरावर पडलेल्या धाडसी दरोड्यात लाखो रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला. या घटनेनंतर सदरील व्यापारी व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव भयभीत झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य समाजाच्या असंख्य बांधवांनी रविवारी दिनांक 16 जून रोजी येरावार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना धीर दिला. या संदर्भात दरोडेखोरांना 48 तासात अटक करावी अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कंधार येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या प्रकरणाचा छडा लावावा असे विनंती करण्यात आली आहे. या घटने...
माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL

माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। हरणाच्या बेंबित मनमोहक, सुगंधीत कस्तुरी असते मात्र तिचा सुगंध तिलाच घेता येत नाही. 'खाकेत कळसा गावाला वळसा' या म्हणीप्रमाणे सुगंधासाठी ती सारा जंगल पिंजून काढते असे सांगितले जाते. अशीच स्थिती दिसुन येत असुन मृगाच्या कस्तुरीचा सुगंध शेतकऱ्यांना घेता येईल काय? अशी चर्चा शेतकऱ्यामधून केली जात आहे. निसर्गाच्या तीन ऋतूमध्ये आणि २७ नक्षत्रांच्या तुलनेत मृग नक्षत्र हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा नक्षत्र आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाला सुरुवात होत असून, याच नक्षत्रावरून शेतीची दिशा आणि दशा ठरत असते. आदिवासी बहुल उद्योगविरहित माहूर तालुक्यात ऐकमेव शेती केली जाते. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून, रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच शेतकऱ्यांची शेतीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली. आहेत. ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात...
error: Content is protected !!