Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे गरजूंना मिनीबस ,व्हीलचेअर, आणि वॉटर कुलरचे वितरण -NNL

स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे गरजूंना मिनीबस ,व्हीलचेअर, आणि वॉटर कुलरचे वितरण -NNL

नांदेड
नांदेड। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाते. ग्राहकांची विश्वासार्हता जपत बँकेने ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ देते. इतर सेवा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून सामाजिक दायित्व बँक पार पाडत असते. याचाच एक भाग म्हणून बँकेने दिनांक 27 जून रोजी शिवाजीनगर नांदेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वसरणी येथील दिव्यांग शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्याना सात व्हीलचेअरचे वाटप केले. तसेच लातूर येथील दिव्यांग संस्थेच्या दिव्यांगांना ये -जा करण्यासाठी मिनी बसचे वितरण केले. तसेच नांदेडच्या महानगरपालिकेच्या 16 शाळांना वॉटर कुलर चे वितरण बँकेचेमहाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद कुमारसिंग .महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुमार चौधरी .नांदेड विभागीय कार्यालयाचे उप महा व्यवस्थापक प्रिया कुमार सरिगला आणि नांदेड क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक श्र...
सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) उत्तीर्ण होऊन आदिवासी , दुर्गम , डोंगरी तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश मिळविल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तालुक्यातील गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात  इयत्ता पाचवीत शिक्षण घेतलेले आशय आशा राजा तामगाडगे , कनिष्क पुष्पाताई कपिलकुमार  भवरे यांचा सैनिक शाळा चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आणि अनवित अश्विनी राहुल तामगाडगे याचा सैनिक शाळा रेवा (मध्यप्रदेश) येथे प्रवेश झाला असून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. बिनपगारी रजा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे यांनी सतत 3 महिने या विद्यार्थ्यांचा सराव घेतला होता. 300 गुणांपैकी आशय 264 , कनिष्क 243 व अनवित 229 गुण घेऊन कठीण परिश्रम, कुशाग्र बुद्धी,  जिद्द आणि अभ्यासू वृत्ती यामुळेच  जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुले असल...
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळून देण्यासाठी हिमायतनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने यांची धडपड -NNL

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळून देण्यासाठी हिमायतनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने यांची धडपड -NNL

नांदेड
हिमायतनगर| शहरातील ज्या शेतकऱ्यांना गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. त्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीले आपल्या बँकेच्या खात्याची ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केल्यानंतर हिमायतनगर येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने हे शहर परिसरातील ज्या शेतकऱ्यांची नवे यादीत आहेत त्यांना दूरध्वनीवर संपर्क करून आपले नाव अतिवृष्टीच्या अनुदान यादीत आलेले आहे असे सांगत तात्काळ बँक खात्याची ई-केवायसी करून घेऊन अनुदान प्राप्त करून घ्यावे अशी विनंती करत आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सामाजिक कार्यात हीरीहीने सहभागी होणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा परमेश्वर मंदिराचे संचालक संजय माने हे ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावाने अनुदान आले किंवा यादीत नाव आहे कि नाही. याची माहीती नसलेल्या...
इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL

इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL

नांदेड
नांदेड,बिलोली, गोविंद मुंडकर। इंग्रजी माध्यमांच्या शाळातील मराठी अमृतवाणी हे पुस्तक यातील चुका यामुळे पालक आणि विद्यार्थी यासह शिक्षकात गोंधळ निर्माण झाला आहे. इयत्ता तिसरीच्या अमृतवाणी यातील *कुशाग्र राजा* या पाठातील प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा यातील दोष शिक्षण विभागाने का दूर केले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गाढवाच्या ऐवजी म्हशीचा उल्लेख करून शिक्षण क्षेत्रातील गाढवाचा गोंधळ चर्चेला आला आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींना मराठी शिक्षण आणि त्याविषयीचे ज्ञान सुलभ पद्धतीने अवगत करण्यासाठी विविध संशोधन केले जातात. शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे इंग्रजी माध्यमातील मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकात त्रुटी नव्हे तर अनेक दोष आढळून आले आहेत. राज्य प्रकल्प समन्वयक श्री भाऊ गावंडे यांनी महाराष्ट्र शासन यांच्यावतीने युनिसेफ उपक्रमा...
मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL

मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL

Blog
गोवा| भारताच्या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे; मात्र सध्याच्या काळात मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत पडून रहाते, त्याचा धर्माला काही उपयोग होत नाही. दुसरीकडे पडझड झालेल्या जीर्ण मंदिरांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे भाविकांच्या दानाचा पैसा हा बँकेत पडून रहाण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरणे आवश्यक आहे. हे पुनर्निर्माणाचे कार्य करतांना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘समस्त महाजन संघा’चे कार्यकारी विश्वस्त श्री. गिरीश शहा यांनी केले. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी ते ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ यावर बोलत होते. या प्रसंगी ‘मंदिराचे अर्थशास्त्र’ यावर बोलतांना श्री. अंकीत शहा म्हणाले, ‘‘विन...
मंदिरात पूजेला बंदी घालण्याचा निर्णयाचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध ! – पूजा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात घुसून आंदोलन करणार -NNL

मंदिरात पूजेला बंदी घालण्याचा निर्णयाचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध ! – पूजा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात घुसून आंदोलन करणार -NNL

Blog
गोवा| देशातील एकमेव भारतमातेचे मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यामध्ये भारतमातेचे मंदिर आहे. वर्ष १९४८ पासून अर्थात् गेल्या ७५ वर्षांपासून तिथे पूजा होत असतांना नुकताच पुरातत्त्व विभागाने पुजार्‍यांना एक पत्र पाठवून इथे पूजा करता येणार नाही, असा तुघलकी फतवा काढला आहे. त्याचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एकमुखाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच तातडीने पूर्वीप्रमाणे सदर पूजा चालू करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सदर ठराव मंजूर करण्यात आला. पूर्वीप्रमाणे तात्काळ पूजा सुरू करण्याची परवानगी न दिल्यास शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ देवगिरीतील भारतमाता मंदिरात जाऊन सामूहिक पूजा केल्यास आणि तेथे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास...
शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – खा.अशोकराव चव्हाण -NNL

शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – खा.अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड
मुंबई| महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.खा.चव्हाण म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण भागाला समतोल न्याय दिला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलमाफी, आधारभूत किमतीनुसार कडधान्ये व तेलबियांच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी,कापूस व सोयाबीनचे भाव घसरल्याने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, ई-पंचनामा योजना आदी घोषणांमधून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, बचत गटांच्या निधीत वाढ, महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा आदी निर्णयातून महायुत...
एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

नांदेड
नांदेड| एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅन्ड मशिन लर्निग तसेच ऑटोमेशन अ‍ॅन्ड रोबोटीक यासाठी विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन आधुनिक पदवी अभियांत्रिकी विद्याशाखेस 2024-25 पासून परवानगी दिली आहे. महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी नांदेड येथे 1984 साली मराठवाड्यासारख्या मागास प्रभागातील युवकांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली होती. तेव्हापासून महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या विविध पाच शाखा, अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाच्या चार शाखा आणि रिसर्च सेंटर कार्यरत आहे. महाविद्यालयातून गेल्या 36 वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध आस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजही येथील विद्यार...
पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य नाही ! – कर्नल आर.एस्.एन्. सिंह, संरक्षण विशेष तज्ञ,दिल्ली -NNL

पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य नाही ! – कर्नल आर.एस्.एन्. सिंह, संरक्षण विशेष तज्ञ,दिल्ली -NNL

Blog
गोवा| भारतविरोधी ‘इकोसिस्टिम’चा प्रारंभ बहुचर्चित ‘तुकडे तुकडे’ आंदोलनापासून झाला. हे आंदोलन हिंदूंच्या प्रतिक्रियेची चाचणी घेण्यासाठी केले गेले होते. या आंदोलनाला विरोध करणारे किती, तटस्थ किती आणि समर्थन करणारे किती जण आहेत, याची हे आंदोलन एक चाचणी होती. ‘पॅलेस्टाईन’चे समर्थन करणारे ओवैसीसारखे फुटीरतावादी संसदेत निवडून आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको ! मुसलमानांना कुराण आणि राज्यघटना यांमध्ये श्रेष्ठ काय ? किंवा ख्रिस्ती यांना बायबल आणि राज्यघटना यांमध्ये श्रेष्ठ काय आहे, हे विचारले, तर त्यांचे उत्तर काय असेल, हे आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा ‘देश’ म्हणून विचार करतो तेव्हा त्यासाठी निर्माण केलेली राज्यघटना असते; मात्र आपण जेव्हा ‘राष्ट्र’ म्हणून विचार करतो, तेव्हा त्यासाठी लिखित राज्यघटनेची आवश्यकता नसते. राष्ट्र हे चिरंतन असते. राष्ट्रा...
छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ! – श्री. उदय माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार -NNL

छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ! – श्री. उदय माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार -NNL

Blog
गोवा| दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता कमी करण्याचे काम चालू आहे. आपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य हिंदूंवर मुघलांचा उदात्तीकरण करणारा खोटा इतिहास लादण्यात आला, असे अनेक हिंदूविरोधी नॅरेटिव्ह आजही निर्माण करून हिंदूंमध्ये संभ्रम, भेद आणि न्यूनगंड निर्माण करून हिंदूंना निष्प्रभ केले जात आहे. याविरोधात हिंदूंनी आता जागे होऊन हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ओळखले पाहिजे. त्याचा अभ्यास करून या हिंदूविरोधी नॅरेटिव्हचा समाजासमोर भांडाफोड केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सेव्ह कल्चर सेव्...
error: Content is protected !!