Homeनांदेडएमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

नांदेड| एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅन्ड मशिन लर्निग तसेच ऑटोमेशन अ‍ॅन्ड रोबोटीक यासाठी विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन आधुनिक पदवी अभियांत्रिकी विद्याशाखेस 2024-25 पासून परवानगी दिली आहे.

महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी नांदेड येथे 1984 साली मराठवाड्यासारख्या मागास प्रभागातील युवकांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली होती. तेव्हापासून महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या विविध पाच शाखा, अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाच्या चार शाखा आणि रिसर्च सेंटर कार्यरत आहे.

महाविद्यालयातून गेल्या 36 वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध आस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजही येथील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील महाविद्यालयात संगणकशास्त्र आणि तत्सम आधुनिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाहीत. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून एमजीएम संस्थेने एआयसीटीई – नवी दिल्ली यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांची क्षमता वाढीसाठी आणि नविन शाखा मिळण्यासाठी अर्ज केला होता.

महाविद्यालयातील उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, स्पोर्टिंग स्टाफ आणि भौतिक सोयीसुविधा आदी बाबी तपासत एआयसीटीईने एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅन्ड मशिन लर्निग तसेच ऑटोमेशन अ‍ॅन्ड रोबोटीक यासाठी विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन आधुनिक पदवी अभियांत्रिकी विद्याशाखेस 2024-25 पासून परवानगी दिली आहे. याबरोबरच संगणकशास्त्र आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखांना प्रत्येकी साठ क्षमता असलेली नविन तुकडीवाढही देण्यात आली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना नांदेड येथे आधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाची मोठीच सोय उपलब्ध झाली असल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाठकर यांनी केले आहे. या प्रवेश क्षमता वाढीचे आणि नविन विद्याशाखा प्राप्तीचे महाविद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी स्वागत केले आहे. या प्रवेश क्षमता वाढीसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिरिष कोटगीरे आणि डॉ.महमद जमीरूद्दीन यांचे सहकार्य लाभले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments