Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात -NNL

आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात -NNL

नांदेड
नांदेड। आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आवडीनुसार शिक्षण घ्‍यावे. शिक्षण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच आपल्याला प्रगती साधता येते, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. लोहा तालुक्‍यातील माळाकोळी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा वर्ग खाली बांधकाम व ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या प्रसंगी सरंपच गंगाबाई माधवराव तिडके, प्राथमिक विभागाच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गट विकास अधिकारी डी.के. आडेराघो, पोलिस निरिक्षक संजय निलपत्रेवार, उपसर...
राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर -NNL

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर -NNL

महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी, मेड...
हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजनाद्वारे हदगाव शहर व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या विकास कामाची माहीती देणारे फलक संबंधित कञांटदारांनी लावले नसल्याने या कामात 'कुछ तो गडबड है 'चे स्पष्ट मत बहुतांशी रोडचा दर्जा पाहील्यावर दिसुन येत आहे. हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपयाचे निधीतून रोडचे विकास कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, शासनाच्या विविध विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या करोड रुप्याच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. शासना दारे लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या नावाखाली निधी आणला अस सागतात. पण ते काम कोणत्या कंञाटदाराच्या नावावर कोणत्या एजन्सीच्या नावावर आहे, आणि काम कुणी तरी तिसरी व्यक्ती करत असल्याने माञ कामाचा काहीच दर्जा राहीलेला नाही. या बाबतीत नागरिक व ग्रामस्थ अनभिज्ञ असुन, संबंधित विभाग काम आमच्या विभागामा...
विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन -NNL

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त सन 2024-25 या वर्षात प्रवेशित इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मुदतीत मिळाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयस्तरावर 1 व 2 जुलै रोजी मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल अधिकारी) यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रामार्फत सन 2024-2025 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 1...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी -NNL

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी -NNL

नांदेड
नांदेड| विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. या योजनेतर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय (उदा. बेकरी, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रीकेशन ) व सेवा उद्योग (उदा. वैद्यकीय सेवा, ब्युटीपार्लर, सलून) साठी अर्ज करता येतील. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजनेचे https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी अ...
राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

महाराष्ट्र
पुणे। राजपूत (भा) समाजा विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके याच्यावर शासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी या स्वरूपाची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर व राजपूत समाज सभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरूवार दि. २७ जून २०२४रोजी वाशिम मध्ये tv9 या चॅनलच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यानी राजपूत (भामटा) समाजा बदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामूळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय राजपूत समाजाला टार्गेट करत समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे चुकीचे काम करत आहेत, अश्या समाज द्रोही व्यक्तीला महाराष्ट्रात फिरण्यावर तात्काळ प्रभावाने बंद...
सिध्दार्थनगर व फुलेनगर भागातील विजपुरवठा पूर्ववत करा अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत-NNL

सिध्दार्थनगर व फुलेनगर भागातील विजपुरवठा पूर्ववत करा अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत-NNL

नांदेड
हिमायतनगर, असद मौलाना। शहरातील फुले नगर व सिद्धार्थ नगर भागात मागील काही दिवसांपासून वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याने येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून निवेदनाद्वारे विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. हिमायतनगर शहरांसह फुलेनगर व सिद्धार्थनगर येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून वारंवार यावेळी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने या भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पीन्याच्या पाण्याची समस्यचा सामना करावा लागतो आहे, परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोअर मध्ये पाणी असूनही विजेअभावी पाणी मिळत नाही....
आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल – डॉ. नामदेवराव कराड -NNL

आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल – डॉ. नामदेवराव कराड -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी तोडीसतोड असे प्रा.हाके आणि नवनाथ यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ओबीसींच्या २९% आरक्षणाला धक्का लावाल तर खपऊन घेतले जाणार नाही. राजकारणातही ओबीसींचा वाटा निश्चीत करावा नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देत डाॅ.नामदेवराव कराड यांनी आंदोलन प्रमुखांचे कवच होऊन ओबीसींनी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहाण्याचे आवाहनही केले आहे. कुणबीच्या नोंदी निर्गमित करणार्‍या यंत्रणेच्याही कामकाजाची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. सग्गेसोयर्‍यांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळऊ इच्छिणार्‍यांनी खुशाल स्वतंत्र आरक्षण मिळऊन घ्यावे, परंतू ओबीसी आरक्षणात हात घालण्याचा प्रयत्न करु नये. आणि तो आम्ही सहनही करणार नाही अशा आशयाचे पत्रही डाॅ.कराड यांनी महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे. ओबीसीत घुसखोरी करणार्‍या आंदोलकांकडून...
तालुक्यात गुटखा तस्करी जोमात पण अन्न प्रशासन विभाग मात्र कोमात; अर्थपूर्ण व्यवहारामुळे कार्यवाही मात्र शून्य -NNL

तालुक्यात गुटखा तस्करी जोमात पण अन्न प्रशासन विभाग मात्र कोमात; अर्थपूर्ण व्यवहारामुळे कार्यवाही मात्र शून्य -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाने केलेली गुटखाबंदी ही कागदपत्रीच किनवट आदिवासी व दुर्गम भागाचा फायदा घेऊन तालुक्यातील सारखणी बोधडी,इस्लापूर, शिवनी, ही मुख्य व्यापार पेठेशी संबंधित असलेली मोठी गावे आता गुटखा तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहेत . संबंधित गुटखा तस्करीचे धागेदोरे हिमायतनगर तालुक्यातील एका बलाढ्य व्यावसायिकाचे असल्याचे बोलले जाते. या सर्व बाबीकडे अन्न प्रशासन विभाग मात्र झोपेचं सोंग घेऊनही बघ्याची भूमिका घेत आहे. शासनाने गुटखा,, केमिकल मिश्रित अन्नधान्य अनेक घातक पदार्थाला आळा बसावा यासाठी प्रशासनाची अन्न भेसळ यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हि यंत्रणा कार्यान्वित केली आहेत. पण अनेक दिवसापासून गुटखा, तस्करीचे व्यवसाय चालू आहेत. अनेक वृत्तपत्रातून वृत्तही प्रकाशित झाले. तरी संबंधित प्रशासन झोपेचे सोंग का घेतंय ? यावर कधीच मोठी कार्यवाही का होत नाही? हे न उलगडणार को...
श्रीपाद नगर कौठा येथील दतमंदीर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा -NNL

श्रीपाद नगर कौठा येथील दतमंदीर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा -NNL

नांदेड
नवीन नांदेड। श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक, महापूजा व मुर्ती प्राणप्रतिष्ठा , महाप्रसादाचे आयोजन ३० जुन रोजी करण्यात आले आहे. दत मंदिर श्रीपाद नगर कौठा येथे मित्ती ज्येष्ठ कृ. ९, शके १९४६ रविवार, दि.३० जुन २४ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा दतमंदीर श्रीपाद नगर कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. मिरवणुक सकाळी ९ ते १२ वा.रविनगर, विठ्ठल रुक्माई मंदीर ते श्रीपाद नगर, दत्त मंदीर महापुजा, होमहवन व मुर्ती प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद दुपारी २ ते आपल्या आगमनापर्यंत, पंचपदी सायंकाळी ६:३० वाजता, या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन माजी नगरसेवक राजु पाटील काळे, माजी नगरसेवक राजु पाटील गोरे,माजी नगरसेवक पांडुरंग काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगा प्रसाद काकडे,विठ्ठल गोविंदराव काळे (समिती अध्यक्ष),...
error: Content is protected !!