Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL

Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL

नांदेड
नांदेड। शेतीसाठी लागणाया खर्चामुळे शेती नेहमी तोट्यात जाते आहे शेतकऱ्यांना सातत्याने ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकावर अनेक रोगांचे सावट, नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतीव्यवसाय व शेतकरी, अडचणीत सापडले आहेत. आज शेतकरी राजा हा नावापुरताच राहिला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी शेती व्यवसायात उत्पन्न कमी, खर्च जास्त, म्हणून शेतकरी त्रस्त अशी अवस्था आज घडीला निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व लहान कृषी केंद्र चालकांच्या स्वातंत्र्यासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात सचिन कासलीवाल यांनी केली आहे.. शेतकरी जेव्हा बी-बियाणे, खते, किटकनाशके, ठिबक संच, मोटार पंप, ट्रॅक्टर खरेदी करतात तेव्हा त्यांच्याकडून ५ % ते २८ % जीएसटी विविध वसुल केला जातो, हा जीएसटी शेतकऱ्यांना परत कसा मिळतो ? तर तो मिळणारची नाही म्हणजे तो बोजा सरळ सरळ शेतकऱ्यांच्या माथी पडतो त्यामुळे शेतीचा उत्पादन...
finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL

finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL

नांदेड
नांदेड| जीवनातील अडचणीतून संधी शोधणाऱ्याला यशाचा मार्ग सापडतो. आजच्या समाजातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि ऍकेडेमिया यांच्यातील दरी कमी करून फिनिशिंग स्कुल प्रोग्रॅमद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे मत तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालयाचे सह-संचालक उमेश नागदेवे यांनी व्यक्त केले. नांदेड शहरातील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लेसमेंट फेस्टिवल 2024 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. एकीकडे शिक्षणानंतर नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे उद्योगक्षेत्राला तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण मनुष्यबळ मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढत मराठवाड्यातील तरुणांना तब्बल 40...
Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख
मध्यरात्री हमसफर एक्स्प्रेस जम्मू स्टेशन ला पोंहचली. सर्वजण खाली उतरल्यावर हजेरी घेतली. शंभर टक्के उपस्थिती असल्यामुळे बिनफिकीर झालो. जम्मू स्टेशनवर भरपूर गर्दी असल्यामुळे सर्वांना अमरनाथ यात्री संघाच्या कॅप घालायला लावल्या. स्टेशन बाहेर आमच्या गाड्या येणार असल्यामुळे सामान घेऊन बाहेर पडलो. यावेळी मुद्दामहुन चंदिगडच्या एसी बसेस बुक केल्या होत्या. त्या दोन बसेस येण्यासाठी थोडा वेळ लागला. देर आये दुरुस्त आये या उक्ती प्रमाणे आलेल्या बस एकदम नवीन व आरामदायी होत्या. मी नेहमी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी आम्ही कधी एसी बसेस वापरल्या नव्हत्या. गेल्या वर्षी जम्मू मध्ये गर्मी जास्त होत असल्यामुळे यावेळी एसी बस बुक केल्या होत्या. ४५ सीटर टू बाय टू पुश बॅक नवीन बस गुरु नानक ट्रॅव्हल्स ने पाठविल्या होत्या. त्यामुळे सर्वजण खुश झाले. टूरमध्ये बसच्याvमागेपुढे बसण्यावरून नेहमी भांडणे होत...
An inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL

An inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 37 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 26 टोळ्यामधील 79 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 16 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शशिकांत सखाराम भडगळ वय 22 वर्ष राहणार कर्मविरनगर, नांदेड याचेवर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल अस...
No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

नांदेड
वाळकेवाडी/हिमायतनगर,शंकर बरडे| हिमायतनगर गटविकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वाळकेवाडी गावात रस्ते,घरकुल व सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करीत आहेत. याचा सतत पाठपुरावा करुनही याकडे संबंधित अधिकारी - पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आसल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर व ग्रामविकास अधिकारी यांना दुधड-वाळकेवाडी येथिल समाज बांधवांने निवेदन देऊन आपल्या समस्या कळविल्या आहेत. जी ग्रामपंचायत आम्हाला नागरी सुविधा देत नाही तशी ग्रामपंचायत काय..? कामाची असा संतप्त सवाल वाळकेवाडी येथील वडार समाज बांधवांने केला आहे. याबाबत सविस्तर व्रत असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड-वाळकेवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र ४ मध्ये वडार समाजाची संख्या जवळपास ४५० ते ५०० ...
Gujarati High School Nanded | नांदेडच्या गुजराथी हायस्कूलचे स्कॉलरशिप परिक्षेत मोठे यश -NNL

Gujarati High School Nanded | नांदेडच्या गुजराथी हायस्कूलचे स्कॉलरशिप परिक्षेत मोठे यश -NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, गुजराती हायस्कूल नांदेडचे इयत्ता पाचवी मधुन तब्बल ५० विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी ८ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर इयत्ता आठवी मधून तब्बल ४४ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी १६ विद्यार्थी हे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत यात चि. अथर्व रामदास इसानकर (206 गुण) ,कु. गुंजन गजेंद्र गजेंद्र गुंडाळे (202 गुण) , चि. ऋषभ संजीवन मोरे (196 गुण), चि. अद्वैत अतुल नागरगोजे (192 गुण ) ,चि. कृष्णा विलास जाधव (186 गुण) , कु. भूमी दिनेश मारकड (184 गुण) ,कु. सौम्या सचिन कारले (182 गुण) ,चि. वेदज्ञ संतोष कुलकर्णी ...
पद्मशाली कर्मचारी संघटने कडून नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त, सेवानिवृत्त, पदोन्नत कर्मचारी यांचा सत्कार – NNL

पद्मशाली कर्मचारी संघटने कडून नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त, सेवानिवृत्त, पदोन्नत कर्मचारी यांचा सत्कार – NNL

छत्रपती संभाजीनगर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. ७ जुलै २०२४ (रविवार) रोजी सकाळी १० वाजता, शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे करियर मार्गदर्शन शिबिर, २१० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १८ नवनियुक्त, १२ सेवानिवृत्त, १० पदोन्नत - सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सत्कार कार्यक्रम उत्सवात संपन्न झाला. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्री श्रीधरराव सुंकुरवार गौरवाध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबाद, स्वागताध्यक्ष श्री राजेश यन्नम माजी नगरसेवक महानगरपालिका नांदेड, विशेष अतिथी मा. श्री अशोकजी इंदापुरे निमंत्रक विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्र राज्य, मा.प्रा.श्री बालाजी कोंपलवार माजी उपप्राचार्य तथा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, प्रमुख उपस्थिती श्री प्रल्हादराव सुरकुटवार उपाध्यक्ष अ.भा. प. संघम हैद्राबाद,श्री प्रकाशभाऊ मारावार शिवसेना सहसंपर्क प्रमुख नांदेड, श्...
रा .रं. बोराडे यांच्या ‘माझं गाव माझी माणसं’ कथासंग्रहाचे प्रकाशन -NNL

रा .रं. बोराडे यांच्या ‘माझं गाव माझी माणसं’ कथासंग्रहाचे प्रकाशन -NNL

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर| सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या कोरोना काळातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे दर्शन घडविणाऱ्या कथांचा 'माझं गाव माझी माणसं' या संग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नामवंत प्रकाशक बाबा भांड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाडेवाले व प्रा. गणेश मोहिते हे होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक करताना रा. रं. बोराडे गुरुजींचे साहित्य म्हणजे सुवर्णकण आहेत. ते हरवू न देता सारे एकत्र करून वाचकांच्या हाती दिले पाहिजेत असे विचार मांडले. यानंतर बाबा भांड यांच्या हस्ते 'माझं गाव माझी माणसं' या संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना बोराडे गुरुजी यांनी आपण साहित्य अकादमीची सर्व पुस्तके वाचली आहेत. आता वयोमानानुसार वाचता येत नाही परंतु इतर...
132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा, मानवाडी फाटा येथे 132 केव्ही उपकेंद्र मंजुरीला मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी -NNL

132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा, मानवाडी फाटा येथे 132 केव्ही उपकेंद्र मंजुरीला मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी -NNL

नांदेड
हिमायतनगर| हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून अनेक प्रकारच्या विकास कामांना गती प्राप्त होत आहे. आता विद्युत महावितरण कंपनीकडून १३२ केव्ही उपकेंद्र व तसेच ३३ केव्ही उपकेंद्र येथे जादा अतिरिक्त विज मिळावी म्हणून ५ एम. व्ही. ए. टार्न्फामर मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी मिळाली असल्याने बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून अनेक गावे यापुर्वी पेक्षा अधिक गतीने प्रकाशमान होणार आहेत. हदगाव, हिमायतनगर तालुक्यात विजेची समस्या नागरिकांची झोप उडवत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांना सातत्यानं विजेची टंचाई व तुटवडा होत असल्याने नागरीकात विज समस्या अतिव स्वरूपाची जाणवत आहे. हि बाब हेरून लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन हदगाव हिमायतनगर विधानसभा ...
रवींद्र राठोड यांची अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेच्या जिलाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

रवींद्र राठोड यांची अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेच्या जिलाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

नांदेड
नांदेड| अखिल भारतीय बंजारा सेना या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर रवींद्र गणेश राठोड मु. बळीराम तांडा पोस्ट. पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र 08/07/2024 ते 08/07/2025 पर्यंत अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा हृदय सम्राट मा. भाऊसो. कांतीलाल छगन नायक यांच्या हस्ते देण्यात येऊन नियुक्ती करण्यात केली आहे. नियुक्तीपत्रात म्हणले आहे कि, नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय बंजारा सेना सामाजिक संघटनेच्या जिल्हास्तरावर, तहसील स्तरावर, गावपातळीवर तांडा स्तरावर बंजारा समाजाचे संघटन करावे. प्रत्येक तांडा स्तरावर अखिल भारतीय बंजारा सेनेचे मंडळ नेमून समितीचे फलक लावून कार्यकारिणी जाहीर करावी. तसेच बंजारा समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा घेऊन संघटनेचा विस्तार करावा असेही देण्यात ...
error: Content is protected !!