Homeनांदेड132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा,...

132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा, मानवाडी फाटा येथे 132 केव्ही उपकेंद्र मंजुरीला मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी -NNL

बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नांना मिळणार यश

हिमायतनगर| हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून अनेक प्रकारच्या विकास कामांना गती प्राप्त होत आहे. आता विद्युत महावितरण कंपनीकडून १३२ केव्ही उपकेंद्र व तसेच ३३ केव्ही उपकेंद्र येथे जादा अतिरिक्त विज मिळावी म्हणून ५ एम. व्ही. ए. टार्न्फामर मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी मिळाली असल्याने बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून अनेक गावे यापुर्वी पेक्षा अधिक गतीने प्रकाशमान होणार आहेत.

हदगाव, हिमायतनगर तालुक्यात विजेची समस्या नागरिकांची झोप उडवत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांना सातत्यानं विजेची टंचाई व तुटवडा होत असल्याने नागरीकात विज समस्या अतिव स्वरूपाची जाणवत आहे. हि बाब हेरून लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील विजेची समस्या निवेदन देऊन मांडली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कोहळीकर यांच्या निवेदनाचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त मागण्या शंभरटक्के पुर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगीतले.

कोहळीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेल्या मागण्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा, व तसेच हदगाव तालुक्यातील अंबाळा ( मानवाडी फाटा ) येथे १३२ केव्ही नवीन उपकेंद्राचा समावेश असून, हदगाव तालुक्यातील निवघा, तळणी, कोळी, बरडशेवाळा, ल्याहरी, घोगरी, मनाठा या गावांतील ३३ केव्ही उपकेंद्रला अधिक विजेची मागणी व आवश्यकता लक्षात घेवून ५ एम. व्ही. ए. चे नवीन ट्रान्स्फाॅरम या जादा अतिरिक्त विजेची याबाबत मागणी केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, अंदेगाव, व वडगाव ज. येथे ही ३३ केव्ही उपकेंद्र ५ एम. व्ही. ए. ट्रान्सफॉर्मर विज मंजूर होण्याबाबत मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्यास हदगाव – हिमायतनगर विधान सभा मतदार संघ हा पुर्वी पेक्षा कितीतरी अधिक पट्टीने प्रकाशमान होणार असून, मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे दिलेला शब्द कधीच फिरवत नाहीत. असा आपणाला आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं आपल्या मागण्या शंभर टक्के पुर्ण होणारच, असा आशावाद बाबुराव कदम कोहळीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना व्यक्त केला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments